बदनापूरचे आमदार नारायण कुचेंच्या भावाची तरुणाला जीवे मारण्याची धमकी? काय आहे प्रकरण?

आम्ही अनेक वर्षांपासून समजाकारणात असून आमच्या कुटुंबियांमध्ये अशी भाषा कुणीही वापरत नाही. राजकीय द्वेषापोटी असे आरोप होत असल्याचं स्पष्टीकरण आमदार नारायण कुचे यांनी दिलं आहे.

बदनापूरचे आमदार नारायण कुचेंच्या भावाची तरुणाला जीवे मारण्याची धमकी? काय आहे प्रकरण?
आमदार नारायण कुचे
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 2:13 PM

औरंगाबाद| बदनापूरचे भाजप (BJP) आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांच्या भावाने एका तरुणाला फोन करून शिवीगाळ केल्याचा आरोप झाला आहे. तसेच पळवून नेऊन जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. नारायण कुचे यांना संत रविदास जयंतीला (Ravidas Jayanti) बोलावू नका, असा मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर सदर तरुणाने केल्याचा राग मनात धरून भाऊ देविदास कुचे यांनी सदर तरुणाला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फोनकॉलची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करत एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तेव्हापासून राजकीय वर्तुळात कुचे यांच्याविरोधात प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणी औरंगाबादमधील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात देविदास कुचे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कुणाला मिळाली धमकी?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजवाडी येथील वाहनचालक जवाहरलाल लक्ष्मण भगुरे यांनी संत रविदास जयंतीच्या कार्यक्रमाला आमदाराला बोलावू नका, असा मेसेज केला. हा प्रकार भाजप आमदार नारायण कुचे यांचे भाऊ देविदास कुचे यांना कळला. त्यावरून 14 फेब्रुवारी रोजी दुपारी सदर तरुणाला फोन करून, असा मेसेज का केला, अशी विचारणा करत शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप भगुरे यांनी तक्रारीत केला आहे.

आरोप राजकीय द्वेषातून- कुचे

दरम्यान, या प्रकरणी आमदार नारायण कुचे यांना प्रतिक्रिया विचारली असता, सदर प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून पाहणे गरजेचे आहे. मी 25 वर्षांपासून स्वखर्चाने संत रविदास जयंतीनिमित्त कीर्तनाचे आयोज करतो. आम्ही अनेक वर्षांपासून समजाकारणात असून आमच्या कुटुंबियांमध्ये अशी भाषा कुणीही वापरत नाही. राजकीय द्वेषापोटी असे आरोप होत असल्याचं स्पष्टीकरण आमदार नारायण कुचे यांनी दिलं आहे.

इतर बातम्या-

Video | ‘याला म्हणतात मावळा’ अखेर शब्द पाळला! अमोल कोल्हे यांनी मांड टाकली, दंडही थोपटले

संजय राऊतांकडून ट्विटची मालिका, बाप बेटे जेलमध्ये जाणारनंतर ACB, CBI चौकशीची मागणी; मोहित कंबोजचेही प्रत्युत्तर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.