भोंग्यावरून पहिला गुन्हा दाखल; राज ठाकरेंच्या सभेआधीच तक्रार; प्रकरण चिघळणार

मस्जिदीकडे भोंग्याचे तोंड करुन गाणे वाजवल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांनी मस्जिदीकडे भोंग्याचे तोंड करुन गाणे लावले होते.

भोंग्यावरून पहिला गुन्हा दाखल; राज ठाकरेंच्या सभेआधीच तक्रार; प्रकरण चिघळणार
औरंगाबादमध्ये भोंग्यावरुन पहिला गुन्हाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 6:19 PM

औरंगाबाद: राज्यात मनसेकडून (Maharashtra Nav Nirman Sena) ज्या भोंग्यावरुन राजकारण सुरु करण्यात आले. जो भोंगा आणि हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) आमदार, खासदार असणारे राणा दांपत्याला कोठडीची हवा खावी लागली, त्याप्रकरणावरुन आता औरंगाबादमध्ये राज्यातील पहिला गुन्हा दाखल केला गेला आहे. मस्जिदीकडे भोंग्याचे (Loudspeaker) तोंड करुन गाणे वाजवल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी किशोर गंडापा मलकूनाईक यांच्या विरोधात सातारा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या या सभेला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळे हा वाद ताजा असतानाच हा गुन्हा दाखल केला गेल्याने औरंगाबादमधील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

रेल्वे कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा

औरंगाबादमधील सातारा पोलीस स्थानकात मस्जिदीकडे भोंग्याचे तोंड करुन गाणे वाजवल्यानंतर रेल्वे कर्मचारी असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यानंतर तातडीने भाजपने सातारा पोलीस स्थानकाला भेट देऊन याप्रकरणाची माहिती घेण्यात आली. याप्रकरणी गुन्हा मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे. भाजप कार्यकारिणीनी या प्रकरणाची चौकशी करावी नंतरच गुन्हा नोंद केला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

औरंगाबादमध्ये मस्जिदीकडे भोंग्याचे तोंड करुन गाणे वाजवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कृत्यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकारिणीने सातारा पोलिसात जाऊन भेट घेऊन गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.