Aurangabad | 23 मे रोजी औरंगाबादेत भाजपाचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, 25 हजार महिला हंडे घेऊन महापालिकेवर धडकणार

50 टक्के कपात करण्यात आली. मात्र आतापर्यंत वसूल केलेली पाणीपट्टीही परत करा, अशी मागणी भाजपने केली आहे. या सर्व मागण्यांसाठी 23 मे रोजी दुपारी चार वाजता भाजप विराट मोर्चा काढणार असल्याचं कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Aurangabad | 23 मे रोजी औरंगाबादेत भाजपाचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, 25 हजार महिला हंडे घेऊन महापालिकेवर धडकणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 1:48 PM

औरंगाबादः मे महिन्याचा वाढलेला पारा आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचा उसळलेला जनक्षोभ, याच पार्श्वभूमीवर भाजपतर्फे (BJP) पाणी समस्येवर मोठं आंदोलन करण्यात येत आहे. येत्या 23 मे भाजप मोठा जल आक्रोश मोर्चा शहरातून काढणार आहे. नागरिकांनाशहरातील  विशेषतः महिलांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजप नेते डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाविषयी माहिती दिली. रिकामे हंडे घेऊन महिला आणि शहरातील नागरिकांचा हा मोर्चा महापालिका आयुक्तालयावर धडकणार आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावरील औरंगाबादमधील हा विराट मोर्चा असेल, असं म्हटलं जात आहे.

पाणीपट्टी कपात, पण प्रश्न कायम

शहरातील विविध भागांमध्ये आठ ते नऊ दिवसांनी पाणी येते. वाढता उन्हाचा पारा पाहता हा पुरवठा अपुरा होतो. त्यातही लोडशेडिंग आणि अन्य कारणामुळे अत्यंत तुटपुंजा पुरवठा होतो. त्यामुळे गेल्या अनेक आंदोलनांद्वारे औरंगाबादकर नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. वाढता जनक्षोभ लक्षात घेता पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी निम्म्यानी कमी केली. मात्र यामुळे पाण्याचा प्रश्न काही सुटलेला नाही, अशीच जनभावना व्यक्त होत आहे. राज्यात सर्वाधिक 4050 पाणीपट्टी औरंगाबादची होती. यात 50 टक्के कपात करण्यात आली. मात्र आतापर्यंत वसूल केलेली पाणीपट्टीही परत करा, अशी मागणी भाजपने केली आहे. या सर्व मागण्यांसाठी 23 मे रोजी दुपारी चार वाजता भाजप विराट मोर्चा काढणार असल्याचं कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मनसेची पाणीसंघर्ष यात्रा

पाणी प्रश्नावर वातावरण तापलं असताना मनसेनंही सध्या शहरातील वॉर्डा-वॉर्डातून संघर्ष यात्र काढली आहे. 25 वर्षांपासूनच्या पाणी समस्येवर नागरिकांकडून 25 हजार पत्रे लिहून घेतली जात असून ही पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत.

MIM ची काय मागणी?

दरम्यान, मनपाने औरंगाबाद शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसुल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करुन सद्यस्थितीत नागरीकांकडे थकीत असलेली पाणी पट्टी पूर्णपणे माफ करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.