Aurangabad ACB Raid | लाचखोर Sanjay Patil च्या लॉकरमध्ये कोट्यवधींचं घबाड, 85 तोळे सोनं, 27 लाखांची रोकड
संजय पाटील याच्या इतर बँकांच्या लॉकरचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. तसेच स्थावर मालमत्ता, फ्लॅट, प्लॉट आणि जमीन, बंगला यातदेखील त्याने गुंतवणूक केली असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
औरंगाबादः शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय राजाराम पाटील (Sanjay Patil) यांच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. चार दिवसांपूर्वीच 40 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti corruption bureau) पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर बुधवारी त्यांच्या उल्कानगरी येथील घराची झाडाझडती (ACB Raid) घेण्यात आली. तसेच बँकेचे लॉकरही तपासण्यात आले. त्यांच्या बँकेच्या लॉकरमध्ये तब्बल 85 तोळे सोनं आणि 27 लाख रुपयांची रोकड आढळली. संजय पाटील याच्या इतर बँकांच्या लॉकरचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. तसेच स्थावर मालमत्ता, फ्लॅट, प्लॉट आणि जमीन, बंगला यातदेखील त्याने गुंतवणूक केली असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. संजय पाटील यांच्याविरोधात आर्थिक मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात येऊ शकतो, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वी एसीबीच्या जाळ्यात
शहरातील मुकुंदवाडी येथील मारोती मंदिर सभागृह बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी एक लाख 25 हजार रुपयांची लाच संजय पाटील यांनी मागितली होती. एसीबीकडे याविरोधात तक्रार येताच शनिवारी उल्का नगरीत रिद्धी-सिद्धी हॉलसमोर रस्त्यावरच 40 हजार रुपयांची लाच घेताना पाटीलला रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. तेथे 1 लाख 61 हजार रोख आणि 183 ग्राम सोने सापडले. दशमेशन नगरयेथील एसबीआय बँकेतील लॉकरच्या चाब्याही सापडल्या. एसीबीच्या पथकाने हे लॉकर बुधवारी उघडले. त्यात 85 तोळे सोने आणि 26 लाख 4 हजार 500 रुपयांची रोख रक्कम सापडली, अशी माहिती अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी दिली.
एका दिवसात जामीन, पुढे काय?
दरम्यान, शाखा अभियंता संजय पाटील याला लाच घेताना पकडल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर एका दिवसातच त्याचा जामीन मंजूर झाला असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. संजय पाटील याच्या इतर बँकांच्या लॉकरचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. तसेच स्थावर मालमत्ता, फ्लॅट, प्लॉट आणि जमीन, बंगला यातदेखील त्याने गुंतवणूक केली असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. संजय पाटील याच्याविरोधात आर्थिक मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात येऊ शकतो. त्याच्या स्थावर मालमत्तेची खुली चौकशी होणार असल्याचेही एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
इतर बातम्या-