Wow Momos ची फ्रेंचायजी घ्यायला गेले अन् 12 लाख उडाले, बिझनेस सुरु करताना सांभाळून बाबांनो…

वॉव मोमोजची फ्रेंचायजी मिळण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही कंपनीकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याने फिर्यादी तलरेजा अस्वस्थ झाले. त्यांनी गूगलवर संबंधित वेबसाइट काळजीपूर्वक पाहिली. त्यानंतर ही वेबसाइट बनावट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

Wow Momos ची फ्रेंचायजी घ्यायला गेले अन् 12 लाख उडाले, बिझनेस सुरु करताना सांभाळून बाबांनो...
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 10:51 AM

औरंगाबादः कोलकत्त्यातील प्रसिद्ध Wow Momos ची फ्रेंजायजी घेऊन बिझनेस सुरु करुया असा प्लॅन असलेल्या व्यावसायिकाला  भामट्यांनी चांगलंच गळाला लावलं. सिंधी कॉलनी परिसरातील हॉटेल व्यावसायिकाच्या (Busunessman cheated) बाबतीत हा प्रकार घडला. Wow Momos ची फ्रेंचायजी (Franchise) घ्यायला गेलेल्या व्यावसायिकाला ऑनलाइन गंडा घालण्यात आला. फेसबुकवर या फ्रेंचायजीसंबंधीची जाहिरात व्यावसायिकाने पाहिली होती. त्यानंतर औरंगाबादेतही आपण अशी शाखा सुरु करू, असा विचार त्याच्या मनात आला. त्या जाहिरातीनुसार, प्रक्रिया करत गेला. मात्र हे संकेतस्थळ बनावट (fake Website) असल्यानं भामट्यांच्या जाळात अडकत गेला. सुरुवातीला सहा लाख त्यानंतर आणखी काही लाख रुपये असे भरत गेले आणि तब्बल 12 लाखांची फसवणूक झाल्यानंतर व्यावसायिकाचे डोळे उघडले. मनात शंका आल्याने त्यांनी वेबसाइट बारकाईने पाहिली आणि ती बनावट असल्याचे उघडकीस आले. व्यावसायिकाने आता पोलिसात धाव घेतली असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडला नेमका प्रकार?

कैलास लक्ष्मणदास तलरेजा असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तलरेजा हे 45 वर्षीय हॉटेल व्यवसायिक आहेत. औरंगाबाद शहरातील सिंधी कॉलनीत त्यांचं हॉटेल आहे. तलरेजा यांचा बीएचआर इंडियन फूड नावानं व्यवसाय आहे. मागील वर्षी डिसेंबर 2021 मध्ये त्यांना फेसबुकवर कोलकत्याच्या वॉव मोमोजबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी गूगलवरून कंपनीची माहिती मिळवली. संबंधित ईमेलवर संपक्त केला. औरंगाबाते वॉम मोमोजची शाखा सुरु करण्याची प्रक्रिया विचारून घेतली. त्यानंतर आरोपींनी तलरेजा यांच्याकडून बँक पासबूक, आधारकार्ड, पॅनकार्ड, शहर आणि शिक्षणाविषयी माहिती विचारण्यात आली. तसेच त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फॉर्मही भरून घेतला गाले. त्यांनतर 6 डिसेंबर रोजी फ्रेंचायजी घेण्यासाठी 8 लाख रुपये द्यावे लागतील, असं सांगितलं गेलं. तसेच हे पैसे काही दिवसानंतर परत मिळतील असंही सांगण्यात आलं. त्यानंतरही वेळोवेळी विविध कारणं सांगत आरोपींनी या व्यावसायिकाकडून तब्बल 11 लाख 96 हजार रुपये लुबाडल्याची तक्रार करण्यात आली आहे.

पैसे भरले पण फ्रेंचायजीच नाही…

दरम्यान, वॉव मोमोजची फ्रेंचायजी मिळण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही कंपनीकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याने फिर्यादी तलरेजा अस्वस्थ झाले. त्यांनी गूगलवर संबंधित वेबसाइट काळजीपूर्वक पाहिली. त्यानंतर ही वेबसाइट बनावट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी जवाहर पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधीची फिर्याद नोंदवली. पोलिसांनी आर्थिक फसवणुकीसंदर्भात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात संजीव कुमार, श्रीवास्तव आणि संदीप कश्यप या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

CCTV Video: पुण्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुंडागर्दी, वाहनांची पुन्हा तोडफोड, सीसीटीव्हीत घटना कैद

RBI Alert : केंद्रीय बँकेच्या नावाने पैसे उकळणारी टोळी सक्रिय, ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहाल?

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.