Chandrakant Khaire: 32 वर्ष वाट पहाण्यात गेले, हिशेब करतो आहे मुंबईत घर का नाही झाले ? खैरंची खंत

औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'मुंबईत अद्याप घर न मिळाल्याची खंत मला अजूनही सतावतेय. आमदार आणि गृहनिर्माण मंत्रीपद भूषवूनही मला मुंबईत घर नाही. आज मागे वळून पाहिले असता 32 वर्षे उलटले तरीही मुंबईत तसा मी बेघरच आहे.

Chandrakant Khaire: 32 वर्ष वाट पहाण्यात गेले, हिशेब करतो आहे मुंबईत घर का नाही झाले ? खैरंची खंत
चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 4:14 PM

औरंगाबाद | राज्यातील 300 आमदारांना मुंबईत घर देण्यावरून महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. औरंगाबादचे शिवसेनेना नेते, माजी आमदार (MLA) आणि एके काळचे गृहनिर्माण मंत्री चंद्रकांत खैरे (Chandrakant  Khaire) यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. राजकीय कारकीर्दीला 32 वर्षे उलटली तरीही मुंबईत घर मिळाले नाही. आता मागे वळून पाहताना मुंबईच्या बाबतीत आपण बेघर असल्याची खंत वाटतेय, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. कोट्यवधींचे मालक असलेल्या आमदारांना मुंबईत घर (MLA houses in Mumbai) देण्याची काय गरज आहे, असा प्रश्न विरोधक आणि जनतेकडून केला जातोय. त्यातच शिवसेनेचे माजी आमदार-खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘मुंबईत अद्याप घर न मिळाल्याची खंत मला अजूनही सतावतेय. आमदार आणि गृहनिर्माण मंत्रीपद भूषवूनही मला मुंबईत घर नाही. आज मागे वळून पाहिले असता 32 वर्षे उलटले तरीही मुंबईत तसा मी बेघरच आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात लवकरच घर मिळणार आहे. त्यामुळे आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत,’ असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

आमदारांच्या घरांवरून महाविकास आघाडीत मतभेद

दरम्यान, राज्यातील 300 आमदारांना मुंबईत घरे देण्यावरून आघाडी सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आधी घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घरे मोफत नसून अत्यंत कमी किंमतीत आमदारांना उपलब्ध होतील, असे सांगितले. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत काही निर्णयच झाला नाही, असे वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदारांना घरे देण्यास माझा वैयक्तिक विरोध असून आमदारांसाठी कोटा असावा, असे म्हटले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या आमदारांना घरे नकोत, असे लेखी देणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच आमदारांना घरे देण्याच्या घोषणेनंतर महाविकास आघाडी तोंडावर पडल्याचे दिसून येत आहे.

इतर बातम्या-

“सरिस्का”मधील आग विझवण्याऐवजी डायरेक्टर अंजली तेंडुलकरांना वाघ दाखवायला घेऊन गेल्याचा आरोप, फोटोही व्हायरल

UP Board 2022 : उत्तर प्रदेशात बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला, 500 रुपयांना विक्री, 24 जिल्ह्यात परीक्षा रद्द

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.