शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद : ‘या’ कारणामुळे अंबादास दानवेंचे समर्थक आक्रमक
निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या अनावरणाचा वाद पेटला. निमंत्रण पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. तसंच अनेक विद्यार्थी संघटनांनाही अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. निमंत्रण पत्रिकेशिवाय कार्यक्रमात प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थी संघटना आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश नसल्यामुळे वाद पेटला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचेही नाव पत्रिकेत नसल्यामुळे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे.