औरंगाबाद | चिकलठाणा ते वाळूज अखंड उड्डाण पुलाच्या DPR ला मंजुरी, मंत्री नितीन गडकरींशी आणखी कोणत्या प्रकल्पांवर चर्चा?

शहरातील या प्रकल्पांच्या माध्यमातून औरंगाबाद तसेच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. औरंगाबादच्या विकासातील हे अभिनव प्रकल्प ठरतील, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत कराड यांनी या बैठकीनंतर दिली.

औरंगाबाद | चिकलठाणा ते वाळूज अखंड उड्डाण पुलाच्या DPR ला मंजुरी, मंत्री नितीन गडकरींशी आणखी कोणत्या प्रकल्पांवर चर्चा?
औरंगाबादमधील अखंड पूलाचा नकाशा पाहताना केंद्रीय मंत्र नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 9:57 AM

औरंगाबादः शहराच्या विकासात मोलाची भर घालण्याची क्षमता असलेल्या चिकलठाणा ते वाळूज (Chikalthana to Waluj) अखंड उड्डाण पूलाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी काल नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत शहरातील या अखंड पुलाच्या DPR ला मंजुरी मिळाली. काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत औरंगाबादचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad), उद्योजक विवेक देशपांचे आणि NHIचे अधिकारी यांची दीर्घ बैठक झाली. यात औरंगाबादमधील प्रमुख प्रकल्पांवर सविस्सतर चर्चा झाली. अखंड उड्डाणपूलाचा नकाशा नितीन गडकरी यांनी अगदी बारकाईने पाहिला तसेच या प्रकल्पाचा DPR तयार करण्याच्या सूचना दिल्या.

अखंड उड्डाणपूलाचा प्रकल्प कसा?

औरंगाबादच्या मध्यवर्ती असलेल्या जालना रोडवर चिकलठाणा ते वाळूज असा अखंड पूल बांधण्याची केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची योजना आहे. यासंबंधीचं सूतोवाच त्यांनी अनेकदा केलं आहे. 20 किलोमीटर लांबीचा हा पूल उभारल्यास वाळूज ते शेंद्रा MIDC परिसरातील सर्व उद्योग वसाहती परस्परांशी जोडल्या जातील. तसेच दळणवळणाचा मोठा ताण कमी होईल. नाशिक, नागपूरमध्ये अशा पुलांची उभारणी झाली आहे. त्याच धर्तीवर औरंगाबादमध्ये पूल उभारल्यास औद्योगिक नगरी औरंगाबादचे रुप पूर्णतः पालटेल.

मार्गातले पूल चांगले असतील तर तसेच ठेवणार, अन्यथा…

हा अखंड पूल बांधण्यात मुख्य अडचण आहे, ती म्हणजे जालना रोडवर आधीच अनेक पूल आहेत. त्यात छावणी, महावीर चौक, क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स, सिडको आदी पुलांचा समावेश आहे. या पुलांवर जवळपास 200 कोटींच्या आसपास खर्च झाला आहे. मग नव्याने अखंड पूल बांधल्यास या पुलांचा पैसा पाण्यात जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र मंत्री नितीन गडकरींनी यावर उपाय सूचवला आहे. शहरातले विद्यमान उड्डाणपूल चांगेल असतील तर ते वापरात आणू, अन्यथा पाडून टाकू, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नवी दिल्लीतील बैठकीनंतर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे फेसबुक पोस्ट

 

दिल्लीतल्या बैठकीत आणखी कोणती चर्चा?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत झालेल्या या बैठकीत औरंगाबादच्या इतर प्रकल्पांवरदेखील सविस्तर चर्चा झाली. ते पुढीलप्रमाणे-

  • औक्ट्रम घाट- औरंगाबाद ते धुळे मार्गावरील कन्नड व चाळीसगाव यादरम्यानच्या औट्रम घाटातील बोगद्याचे काम 10 वर्षांपासून रखडले आहे. जागा अरुंद असल्यामुळे येथे बांधकामास अडचण येत आहे. मात्र आता औट्रम घाटातील 14 किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, तसेच ज्या ठिकाणी जागेची अडचण आहे, त्याठिकाणी छोटे-छोटे बोगदे या महामार्गावर प्रस्तावित करावेत, असे आदेश नितीन गडकरी यांनी काल झालेल्या बैठकीत दिले. तसेच उर्वरीत घाटात चौपदरीकरण करून महामार्ग रुंदीकरणाचे काम लवकर संपवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
  • नगर नाका ते माळीवाडा मार्गे दौलताबाद टी पॉइंटपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत नवी दिल्ली येथील बैठकीत विचार झाला.
  • ए.एस. क्लब ते वैजापूरमार्गे शिर्डी मार्गांचे मजबुतीकरण करण्यास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मार्गाचे 10 मीटरपर्यंत रुंदीकरण आणि दुहेरीकरण केले जाईल.
  • राष्ट्रीय महामार्ग- 211ला निपाणी गावाजवळील शेंद्रा- कुंबेफळ- निपाणी हा जोडणारा मार्ग याविषयी देखील या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

मराठवाड्याच्या विकासासाठी अभिनव प्रकल्प- डॉ. कराड

औरंगाबादमधील चिकलठाणा ते वाळूज हा अखंड पूल, तसेच औट्रम घाटातील रुंदीकरण, नगर नाका ते माळीवाडा आणि दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद किल्ली ते वेरुळ लेणी या रस्त्याच्या विकास कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. या सर्व कामांच्या माध्यमातून औरंगाबाद तसेच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. औरंगाबादच्या विकासातील हे अभिनव प्रकल्प ठरतील, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत कराड यांनी या बैठकीनंतर दिली. इतर बातम्या-

देर आए दुरुस्त आए..! सोयाबीन बाबतचा शेतकऱ्यांचा ‘तो’ एकच निर्णय ठरला ‘टर्निंग पॉईंट’

अजित पवार आदित्य ठाकरेंचा एकाच गाडीतून प्रवास, आदित्य ठाकरेंकडून सारथ्य

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.