Children Vaccination| औरंगाबादेत 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात, वाचा कुठे मिळतेय लस?
12 ते 14 वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स या लसीचे डोस देण्यात येणार आहेत. मुलांना 28 दिवसांच्या अंतराने या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत.
औरंगाबादः कोरोनापासून बचाव करण्याकरिता आतापर्यंत ज्येष्ठ व्यक्तींपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण (Corona Vaccination) करण्यात आले होते. आजपासून म्हणजेच 16 मार्चपासून राज्यातील 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झाले आहे. औरंगाबादमध्येही आज या लसीकरणाला (Children Vaccination) सुरुवात झाली. औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे (Astik kumar Pandey) यांच्या हस्ते प्रियदर्शिनी शाळेत या वयोगटातील लसीकरणाला सुरुवात झाली. सध्या शाळा सुरु आणि परीक्षा सुरु असल्यामुळे सकाळच्या वेळेत लसीकरण केंद्रांवर फारशी मुलांची संख्या आढळून आलेली नसली तरीही दुपारनंतर लसीकरणाला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरात कुठे कुठे लस मिळणार?
या लसीकरणासाठी शहरात तीन केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 12 ते 14 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. – आयएमए हॉल – सिडको एन-2 समाजमंदिर – प्रियदर्शिनी इंदिरानगर शाळा
कोणती लस देणार?
– 12 ते 14 वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स या लसीचे डोस देण्यात येणार आहेत. – मुलांना 28 दिवसांच्या अंतराने या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. – शहरात या वयोगटातील मुलांची संख्या अंदाजे 84,000 एवढी असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अदिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
एकूण लसीकरणात औरंगाबाद पिछाडीवर
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील कोरोनाेच निर्बंध हटवण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये मात्र हे निर्बंध अजूनही कायम आहे. कारण ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे 90 टक्के (पहिला डोस) पूर्ण झाले आहे, त्याच जिल्ह्यांतील नियमात राज्य शासनाच्या वतीने शिथिलता देण्यात आली आहे. औरंगाबाद मात्र हे उद्दिष्ट गाठण्यात अद्याप मागे आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचे उददिष्ट 83 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. लवकरच आपण उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दाखवला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कोरोना लसीकरणासाठीची सक्तीही वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.
इतर बातम्या-