पोलीस गस्तीवर येईनात, नागरिकांच्या हाती काठ्या, पहारा देत चोरट्यांचे शस्त्र आणि गाड्याही पकडल्या
खडीरोड परिसरात चोरट्यांवर लगाम घालण्यासाठी नागरिकांकडून वारंवार पोलीस प्रशासनाकडे विनंती करण्यात आली. मात्र या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवली नाही.
औरंगाबादः दिवसेंदिवस वाढत्या चोरीच्या (Increasing thefts) घटनांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनीच अखेर आता हातात काठ्या घेण्याचं ठरवलं. रात्री डोळ्यात तेल घालून कॉलनीचं रक्षण करायचं आणि संशयितांवर करडी नजर ठेवायची, असा पवित्रा औरंगाबाद शहरातील (Aurangabad city) खडी रोड परिसरातील नागरिकांनी घेतलाय. या परिसरात मागील काही दिवसांपासून चोरी आणि दरोड्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे (Aurangabad police) नागरिकांनी याविरोधात तक्रार केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली, मात्र तीदेखील पूर्ण करण्यात आली नाही. अखेर नागरिकांनी स्वतःच कॉलनीवर पहारा देण्यास सुरुवात केली.
20 ते 25 जणांचा रात्री पहारा
खडी परिसरात सध्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांनी मध्य रात्री पहारा द्यायला सुरुवात केली आहे. या परिसरात दररोज जवळपास 20 ते 25 नागरिकांचा एक ग्रुप हा पहारा देत असतो. विशेष म्हणजे चोरट्यांकडून होणारा हल्ला लक्षात घेता नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेचीही काळजी घेतली आहे. गस्त घालणारे नागरिक हातात लाठ्या-काठ्या घेऊनच फिरत असतात. मात्र तरीही नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन धावून आलेले नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे.
चोरांचे शस्त्र आणि गाड्याही नागरिकांनी पकडून दिले
खडीरोड परिसरात चोरट्यांवर लगाम घालण्यासाठी नागरिकांकडून वारंवार पोलीस प्रशासनाकडे विनंती करण्यात आली. मात्र या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनीच एकत्र येत येथे गस्त सुरु केली. विशेष म्हणजे पहारा देणाऱ्या या नागरिकांनी चोरट्यांची दोन धारदार शस्त्र आणि दोन्ही गाड्या जप्त करून पोलिसांच्या हवाली केल्या आहेत. तरीही पोलीस प्रशासनाला जाग आलेली नाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
इतर बातम्या-