औरंगाबाद जिल्हा काँग्रेसची जम्बो कार्यकारीणी घोषित, कार्यकर्ते कमी अन् पदाधिकारी जास्त!

औरंगाबादः शहरातील महापालिका निवडणुकांचा (Aurangabad Municipal Corporation)मार्ग मोकळा झाल्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेली काँग्रेसची (Aurangabad congress) कार्यकारिणीही जाहीर झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी घोषित केली असून यात तब्बल दीडशे जणांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मराठवाड्यात काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला अत्यंत थंड प्रतिसाद असल्याचे उघडकीस आले होते. […]

औरंगाबाद जिल्हा काँग्रेसची जम्बो कार्यकारीणी घोषित, कार्यकर्ते कमी अन् पदाधिकारी जास्त!
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:23 AM

औरंगाबादः शहरातील महापालिका निवडणुकांचा (Aurangabad Municipal Corporation)मार्ग मोकळा झाल्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेली काँग्रेसची (Aurangabad congress) कार्यकारिणीही जाहीर झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी घोषित केली असून यात तब्बल दीडशे जणांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मराठवाड्यात काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला अत्यंत थंड प्रतिसाद असल्याचे उघडकीस आले होते. याबद्दल वरिष्ठांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने तातडीने कार्याकारिणी जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबादच्या शहराध्यक्ष पदी हिशाम उस्मानी (Hisham Osmani) यांची निवड झाल्यानंतर शहर कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली नव्हती. कार्यकारिणीत स्थान मिळावे, यासाठी अनेकजण प्रयत्नात होते. तर शासकीय कमिट्यांवर निवड व्हावी, यासाठी अनेक पदाधिकारी मुंबईवारीही करून आले होते. त्यातच येत्या काही महिन्यात महानगरपालिका निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणीची नव्याने बांधणी करण्यात आली आहे.

जम्बो कार्यकारिणी जाहीर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मंजुरीनंतर प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी 4 मार्च 2022 रोजी शहर कार्यकारिणी जाहीर केली. यात 20 उपाध्यक्ष, 44 सरचिटणीस, 43 सचिव, 1कोषाध्यक्ष, 2 प्रवक्ते, 40 सदस्य आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. 2019 चे लोकसभा आणि विधानसभा उमेदवार, आघाडी संघटनांचे अध्यश्र प्रदेश पदाधिकारी हे निमंत्रित सदस्य आहेत.

काही दिवसांपूर्वीची आकडेवारी काय?

काँग्रेसच्या सोशल मीडियाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात जिल्ह्यातील सदस्य नोंदणीची स्थिती सांगितली. त्यानुसार, औरंगाबाद पूर्वमध्ये 298, पश्चिममध्ये 67, वैजापूरात 42, सिल्लोडमध्ये 10, गंगापूरमध्ये 442, फुलंब्रीत 680 , पैठणमध्ये 216, कन्नडमध्ये 231 अशी सदस्य नोंदणी झाली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच एक कोटींची नोंदणी करण्याच्या सूचना आहेत. मात्र अद्याप एक लाखांचाही आकडा गाठता आलेला नाही. इंटरटेनच्या विस्कळीत सेवेमुळे ही अडचण येत असल्याचं मुत्तेमवार यांनी सांगितलं होतं.

युवक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी?

नव्या कार्यकारिणीत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर खान यांना सचिवपद देण्यात आले आहे तर युवक काँग्रेसच्या अंतर्गत काम करणाऱ्यांना सरचिटणीसपद देण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत काँग्रेसचे शहर प्रभारी मुजाहिद खान यांच्याकडे तक्रार केल्याचं मुजफ्फर खान यांनी सांगितलं. मात्र यादीत दुरुस्तीच आश्वासन मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. यादीत सोशल इंजिनिअरिंगचा मेळ बसवण्याचा प्रयत्न केला असून ज्यांची नाराजी आहे, ती दूर केली जाईल, असे आश्वासन शहरामध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी दिले आहे.

ग्रामीणची कार्यकारिणी कधी?

दरम्यान, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वातील ग्रामीणची कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्या दोन महिने आधीच प्रदेशाध्यक्षांकडे काळे यांची यादी पोहोचली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ही यादीही लवकरात लवकर येणे अपेक्षित आहे.

इतर बातम्या-

शेतकरीच लावणार अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी, जिल्हानिहाय काय होत आहे निर्णय? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.