AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | उन्हाचा पारा 41 अंशांपुढे, त्यात महावितरणचा लोडशेडिंगचा शॉक, औरंगाबादकर घामाघुम

बाहेर कडाक्याचे ऊन असताना घरात बसलेल्या नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. ज्या भागात सर्वाधिक वीज गळती किंवा वीज बिल थकबाकी आहे, तेथे महावितरणने लोडशेडिंग केले.

Aurangabad | उन्हाचा पारा 41 अंशांपुढे, त्यात महावितरणचा लोडशेडिंगचा शॉक, औरंगाबादकर घामाघुम
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2022 | 9:45 AM
Share

औरंगाबाद | मार्च महिन्यापासून शहरात सुरु झालेली तापमान वाढ (Temperature rise) स्थिरावण्याचे नाव घेत नाहीये. औरंगाबादमध्ये (Aurangabad city) वैशाख महिन्याआधीच तापामानाने 41 अंशांची पातळी गाठली आहे. मागील सात दिवस तपामान चाळीशीपर्यंत होते, मात्र शुक्रवारी त्यात आणखी वाढ होऊन शहराचे कमाल तापमान प्रथमच 41.1 अंसशांपर्यंत पोहोचले. शहरातील चिकलठाणा (Chikalthana) वेधशाळेने घेतलेल्या नोंदीनुसार, यंदाच्या मोसमातला हा सर्वात उष्ण दिवस ठरला. मागील दोन वर्षात 29 मे रोजी 41 अंशांवर पारा गेला होता. यंदा मात्र 20 दिवस आधीच तापमानानं ही पातळी गाठली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिना संपेपर्यंत आणखी किती उष्णतेला शहरवासियांना सामोरं जावं लागेल, याची चिंता नागरिकांना सतावत आहे.

दुपारी 12 पासूनच रस्त्यांवर शुकशुकाट

शहरात सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. दुपारी 12 वाजता तर सूर्य अक्षरशः आग ओकतोय, अशी जाणीव होतेय. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारी बारा वाजेपासूनच शुकशुकाट दिसून येत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवरची वाहने अचानक कमी झालेली दिसून येत आहेत. बाजारपेठा आणि दुकानांमध्येही कमी वर्दळ पहायला मिळतेय. राजस्थानसह उत्तर भारतात उष्ण वारे वाहत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. त्यामुळे शहराच्या कमाल तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे.

मागील आठवड्यात शहराचे कमाल तापमान-

2 एप्रिल- 40.2 अंश सेल्सियस 3 एप्रिल- 40.6 अंश सेल्सियस 4 एप्रिल- 40.6 अंश सेल्सियस 5 एप्रिल- 40.6 अंश सेल्सियस 6 एप्रिल- 40.6 अंश सेल्सियस 7 एप्रिल- 40.8 अंश सेल्सियस 8 एप्रिल- 41.1 अंश सेल्सियस

बाहेर ऊन, घरात लोडशेडिंग

बाहेर कडाक्याचे ऊन असताना घरात बसलेल्या नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. ज्या भागात सर्वाधिक वीज गळती किंवा वीज बिल थकबाकी आहे, तेथे महावितरणने लोडशेडिंग केले. यात सातार परिसर, गारखेडा, पडेगाव, पेठेनगर भागात भारनियमन केले. सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्री व मध्यरात्री अचानक अर्धातास, एक तास, दोन तास असा वीजपुरवठा बंद केला. या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. काही ठिकाणी थकबाकी नसलेल्या भागातही महावितरणतर्फे भारनियमन करण्यात आले. मागणी व पुरवठ्यच समतोल राखण्यासाठी तसे केल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

इतर बातम्या-

Reserve Bank of India : सामनाच्या अग्रलेखातून रिझर्व्ह बॅंकेवरती टीका, निवडणुकांमुळे इंधन दरवाढ कशी रोखून ठेवली

Bhandara Forest | महिला रोहयोच्या कामावर, रानडुकराच्या हल्ल्यात चार महिला जखमी; कोका शिवारातील घटना

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.