Aurangabad | कॉलगर्ल म्हणून तरुणीचा फोटो, नंबरही टाकला, आसाराम बापूंच्या शिष्याला छिंदवाड्यात अटक, औरंगाबादेत तक्रार!
धक्कादायक म्हणजे गोविंद राजेंद्र नाईक असं या आरोपीचं नाव असून तो आसाराम बापू यांचा शिष्य असल्याचे उघडकीस आले. तेथील गुरुकुलमध्ये तो आचाऱ्याचे काम करत होता. पोलिसांना त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
औरंगाबाद | शहरातील एका तरुणीचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) अपलोड करून कॉलगर्ल या नावाने अकाउंट (Fake account) सुरु करण्यात आले. त्यावर तिचा मोबाइल नंबरही टाकण्यात आला. अशा प्रकारे बनावट प्रोफाइल बनवून तरुणीची बदनामी करणाऱ्या इसमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मध्य प्रदेशातील पोलिसांनी (MP Police) या इसमाला पकडलं असून तो मूळचा ओडिशा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस या आरोपीच्या शोधात होते. अखेर मध्य प्रदेश पोलिसांनी छिंदवाडा येथे या इसमाला ताब्यात घेतले. हा इसम आसाराम बापू यांचा शिष्य असल्याचे उघडकीस आले आहे.
सोशल मडियावर कॉलगर्ल म्हणून खाते उघडले
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करणाऱ्या या इसमाचे नाव गोविंद राजेंद्र नाईक असे आहे. तो मूळचा ओडिशा येथील रहिवासी आहे. सोशल मीडियावर औरंगाबाद येथील एका तरुणीच्या नावाने त्याने बनावट प्रोफाइल सुरु केले. तसेच त्यावर तिचे फोटो आणि मोबाइल नंबरही टाकला होता. गंभीर बाब म्हणजे, या तरुणीच्या खात्यावर त्याने कॉलगर्ल अशी माहिती टाकली होती. हा संतापजनक प्रकार कळाल्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर औरंगाबाद पोलिस या इसमाच्या शोधात होते.
छिंदवाड्यातून घेतले ताब्यात
औरंगाबाद येथील तरुणीची फसवणूक करणाऱ्या या इसमाच्या शोधात पोलीस होते. त्यानुसार मध्य प्रदेश पोलिसांचाही याची माहिती मिळाली होती. छिंदवाडा येथे हा आरोपी असल्याची कुणकुण लागल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. धक्कादायक म्हणजे गोविंद राजेंद्र नाईक असं या आरोपीचं नाव असून तो आसाराम बापू यांचा शिष्य असल्याचे उघडकीस आले. तेथील गुरुकुलमध्ये तो आचाऱ्याचे काम करत होता. पोलिसांना त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
इतर बातम्या