Aurangabad | जिल्ह्यात 14 हजार रेशन कार्ड रद्द, काय आहेत कारणं? स्वस्त धान्य कुणाला किती मिळते?

केशरी कार्डधारक कुटुंबांना 8 रुपये प्रति किलो गहू आणि 12 रुपये प्रति किलो तांदूळ या दरात धान्य दिले जाते. इतर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ वितरित केला जातो.

Aurangabad | जिल्ह्यात 14 हजार रेशन कार्ड रद्द, काय आहेत कारणं? स्वस्त धान्य कुणाला किती मिळते?
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः मागील अनेक वर्षांपासून ज्या रेशन कार्डधारकांनी (Ration card) धान्य घेतलेले नाही. तसेच त्यांनी कुठेही नोंद अपडेट होत नाही, अशा खातेधारकांची नावे रद्द करण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) असे 14 हजार रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. देशभरात बोगस रेशन कार्ड काढणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र (Maharashtra) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात कार्ड अॅक्टिव्ह न ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जे कार्ड अपडेट होत नाहीत, अॅक्टिव्ह नसतात, त्यांची एक यादी पुरवठा विभागातर्फे तयार करण्यात आली. त्यानुसार, त्यांचे कार्ड रद्द करण्यात आले आहेत. तसेच कार्ड असूनही धान्य न घेणाऱ्यांची माहिती काढली जाणार असून त्यांच्यावरही आगामी काळात कारवाई होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

कार्ड रद्द करण्याची कारणं काय?

औरंगाबाद जिल्ह्यातील बोगस कार्ड आणि कार्डधारकांवरील नावे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एका कार्डवर साधारणतः चार जणांची नावं धरली तरी 56 हजार नागरिकांची नावं वगळण्यात आली आहेत. कार्ड अॅक्टिव्ह नसणे, चुकीची माहिती देणे, उत्पन्नाची माहिती चुकीची असणे यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळण्यात आली आहेत. अंत्योदय प्राधान्य कुटुंबाचे रेशनकार्ड असेल तर त्यांना सहा महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेणे बंधनकारक आहे. परंतु कार्डधारकांनी रेशन घेतले नाही तर कार्ड रद्द होऊ शकते. अनेक कार्डधारकांनी उत्पन्नाची माहिती चुकीची दर्शवलेली असते. त्याचा जिल्ह्यातील ठोस आकडा अद्याप हाती आला नसला तरही अशा नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दारिद्र्य रेषेखाली किती लोक?

औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे 65 हजार रेशनकार्ड धारक असल्याचा अंदाज आहे. सुमारे तसाडे तीन लाख लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असून जनगणना झाल्यानंतर या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कुणाला किती मिळते स्वस्त धान्य?

केशरी कार्डधारक कुटुंबांना 8 रुपये प्रति किलो गहू आणि 12 रुपये प्रति किलो तांदूळ या दरात धान्य दिले जाते. इतर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ वितरित केला जातो. प्रतिव्यक्ती तीन किलोप्रमाणे धान्य वाटप होते. साखर प्रति कुटुंब 20 रुपयांप्रमाणे वितरीत केली जाते.

इतर बातम्या-

Aurangabad | मेट्रो नकोय, अखंड उड्डाणपूल मंजूर करा, खासदार इम्तियाज जलील यांच्या लोकसभेत आणखी काय मागण्या?

Aurangabad | शहरातल्या नव्या जलवाहिनीच्या कामातील अडथळा दूर, MJP ने 5.80 कोटी भरले, आता तरी गती येणार का?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.