औरंगाबाद जिल्हा दूध संघ निवडणूक: हरिभाऊ बागडे व सुरशे पठाडे यांच्यात प्रतिष्ठेची लढत, बुहतांश जागी एकतर्फी निवडणूक
औरंगाबाद तालुका मतदारसंघातून संघाचे विद्यमान अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. बुधवारी यासाठीचे चिन्हा वाटप करण्यात आले. बागडे यांना कपबशी तर पठाडे यांना पतंग चिन्ह मिळाले.
औरंगाबादः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालकांच्या 14 पैकी 7 जागांवरील संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर आता उर्वरीत 7 जागांवरील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापैकी फक्त औरंगाबाद तालुका मतदारसंघातून संघाचे विद्यमान अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. बुधवारी यासाठीचे चिन्हा वाटप करण्यात आले. बागडे यांना कपबशी तर पठाडे यांना पतंग चिन्ह मिळाले.
सात जागांवर एकतर्फी निकाल?
जिल्हा सहकारी दूध संघाच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक औपचारिकता असल्याचे मानले जात आहे. फुलंब्री मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक संदीप बोरसे हे भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांचे समर्थक राजेश पाथ्रीकर हे आहेत. पाथ्रीकर हे बोरसे यांना पाठींबा देणार असल्याची चर्चा आहे. – भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघात आ. बागडे यांच्या पॅनलचे पुंडलिक काजे आणि मारुती साठे यांच्यात लढत होईल. – कन्नड तालुक्यात गोकुळसिंग राजपूत, सुरेश चव्हाण, संतोष पवार यांच्यात तिरंगी लढत होणार असली तरी राजपूत यांचे पारडे जड आहे. – वैजापूर तालुक्यात कचरू डिके यांचा सामना नंदकुमार जाधव यांच्याशी होईल.
महिलांच्या दोन जागांसाठी चौघी रिंगणात
दरम्यान, या निवडणुकीत महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी आ.बागडे यांच्या पॅनलच्या अलका रमेश डोणगावकर आणि शीलाबाई कोळगे यांची लढत शारदा गीते आणि रुख्मणबाई सोनवणे यांच्यात होणार आहे.
इतर बातम्या-