औरंगाबादः जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत ICU, काम प्रगतीपथावर, काय असतील सुविधा?

महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरचे रुपांतर आता हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. 14 मार्चपासून याठिकाणी ओपीडी सुरु होईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

औरंगाबादः जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत ICU, काम प्रगतीपथावर, काय असतील सुविधा?
सांकेतिक छायायचित्र
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 3:24 PM

औरंगाबादः आपले नातेवाईक गंभीर आजारी असल्यास आयसीयूमध्ये (ICU) भरती करायची वेळ आली तर कुणालाही आधी अद्ययावत सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयांची नावंच आठवतात. मात्र आता नागरिकांना औरंगाबाद जिल्हा रुणालयाचाही पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयातदेखील 20 खाटांचे मोड्युलर आयसीयू (Modular ICU) साकरले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सरकारी रुग्णालयातही आता अत्याधुनिक उपचारांची सोय होईल. सध्या औरंगाबादच्या या रुग्णालयात (Aurangabad Government hospital) 8 खाटांचं आयसीयू आहे. त्यातील सुविधा आणि खाटांचा विस्तार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे 50 खाटांचे आयसीयू तयार केले जाईल. त्यापैकी 20 खाटांचे मोड्युलर आयसीयू असेल. यामुळे गरजू सामान्य जनतेला फायदा होईल, असी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांनी दिली.

नव्या आयसीयुमध्ये काय सुविधा?

– जिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये आधी 08 खाटांची सुविधा होती. आता ती वाढवण्यात येऊन 50 खाटांची सुविधा देण्यात येईल. – जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयुमधील 20 खाटा मोड्युलर आयसीयू प्रकारातील असतील. – नव्या आय़सीययूमध्ये एअर हँडलिंग यंत्रणा, स्वयंचलित खाटा (मोटराइज्ड बेड), अग्निरोधक यंत्रणा, व्हेंटिलेटर आदी अत्याधुनिक सुविधा असतील. – सर्व प्रकारचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी अत्याधुनिक उपाययोजनांचा समावेश असलेले मोड्युलर आयसीयुदेखील असेल.

मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये आता ओपीडीची सोय

दरम्यान, महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरचे रुपांतर आता हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. 14 मार्चपासून याठिकाणी ओपीडी सुरु होईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. कोरोना महामारीदरम्यान, मागील दोन वर्षात या हॉस्पिटमध्ये 8 हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. येथे सीटी स्कॅन, एक्सरे, जनरल ऑपरेशन, प्रसूती, विविध आरोग्य तपासण्या आदी सेवा उपलब्ध होणार आहेत. 350 खाटा आणि ऑक्सिजन सुविधा असणारे हे मनपाचे शहरातील पहिले मोठे हॉस्पिटल आहे. दोन डॉक्टर, सुमारे 40 कर्मचाऱ्यांचा स्टाफ याठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असतात. आता 14 मार्चपासून इतर आरोग्य केंद्रांप्रमाणेच या ठिकाणी ओपीडी सुरु राहील, असे हॉस्पिटलच्या प्रमुख वैशाली मुदगडकर यांनी सांगितले.

इतर बातम्या-

‘मुळशी पॅटर्न’मध्ये चहाची टपरी चालवणारी अभिनेत्री आता चालवतेय कोट्यवधींची कंपनी

रोहयो : रोजगाराची हमी पण अत्यंल्प मजुरी, वर्षभरानंतर झालेली वाढही चक्रावून टाकणारी!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.