Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर, सर्व पदवी परीक्षा पुढे ढकलल्या, काबरा कॉलेजमधील प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चार जून रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमच्या पदवी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

Aurangabad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर, सर्व पदवी परीक्षा पुढे ढकलल्या, काबरा कॉलेजमधील प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मराठवाडा विद्यापीठImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 10:36 AM

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. 4 जून रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 पाच तारखेला आयोजित करण्यात आल्या होत्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेसाठी (Exam) औरंगाबाद शहरातील महाविद्यालये परीक्षा केंद्र म्हणून होते. दरम्यान, काल एकाच बेंचवर चक्क तीन-तीन विद्यार्थी परीक्षेला बसवण्यात आल्याने परीक्षार्थींचा एकच गोंधळ उडाला होता. बीएससी, बायोटेक, बीएससी आयटी या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडला. एकाच बाकावर अत्यंत दाटीवाटीनं विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागल्याने त्यांचा संताप झाला. या प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुलगुरू यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.

एकाच बेंचवर तीन-तीन विद्यार्थी

औरंगाबाद शहरातील काबरा कॉलेजमध्ये एकाच बेंचवर चक्क तीन-तीन विद्यार्थी परीक्षेला बसवण्यात आल्याने परीक्षार्थींचा एकच गोंधळ उडाला होता. बीएससी, बायोटेक, बीएससी आयटी या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडला. एकाच बाकावर अत्यंत दाटीवाटीनं विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागल्याने त्यांचा संताप झाला. गंभीर बाब म्हणजे कॉलेजच्या स्टोअररुममध्येच विद्यार्थ्यांसाठी बेंच टाकून देण्यात आले होते. तेथेही एका बाकावर तिघांना बसवल्याने विद्यार्थ्यांनी कशी बशी परीक्षा पार पाडली. औरंगाबादच्या काबरा कॉलेजमधील या प्रकाराची चर्चा औरंगाबादेत  सुरु होती. अखेर विद्यापीठाकडून कॉलेजवर कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

काल काढलं निवेदन

दरम्यान परीक्षा काल गोंधळ उडाल्यामुळे काबरा कॉलेजमधील परीक्षा केंद्राला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. विद्यापीठांकडून परीक्षार्थींची इतर ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. विद्यापीठाच्या प्र कुलगुरुंनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, ‘ मी स्वतः परीक्षा केंद्रात जाऊन तेथील पाहणी केली. परीक्षा संचालकांना याबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे. संबंधित परीक्षाकेंद्राचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडूनही अहवाल मागवण्यात आला आहे. या दोन्ही अहवालानंतर जे गैरव्यवस्थापन झालं, त्याचं कारण सापडेल. त्यानुसार, जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल. 

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.