Eknath Shinde | काहीही केलं तरी बाळासाहेबांनी जे केलंय, ते कुणी विसरणार नाही, औरंगाबादेत एकनाथ शिंदेंचं मनसेला उत्तर

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यात 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Eknath Shinde |  काहीही केलं तरी बाळासाहेबांनी जे केलंय, ते कुणी विसरणार नाही, औरंगाबादेत एकनाथ शिंदेंचं मनसेला उत्तर
मनसेच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 1:08 PM

औरंगाबादः कुणीही काहीही केलं तरी शिवसेनेला (ShivSena) काहीही फरक पडणार नाही. दंगल असो किंवा इतर कुठली आपत्ती, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी जे मुंबईसाठी केलंय ते कुणीही विसरणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला (MNS) उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमधील अनेक विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हाताने होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि हिंदुत्वावर केलेल्या वक्तव्यावर त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी शिवसेना आणि मुंबईचे नाते अगदी मजबूत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

हेलिकॉप्टरद्वारे समृद्धी महामार्गाची पाहणी

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथील समृद्धी महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. नागपूर ते मुंबई या सर्वोच्च गतीमान असलेल्या महामार्गाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येत्या मे महिन्यात या महामार्गातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री शिंदे यांनी मुंबई ते औरंगाबाद या हवाई प्रवासाचा मार्ग समृद्धी महामार्गाला समांतर ठेवून पाहणी केली. तसेच समृद्धी महामार्गावर हेलीपॅड तयार करून त्यांचे हेलिकॉप्टर येथे उतरवण्यातदेखील आले होते.

02 मे रोजी लोकार्पण

समृद्धी महामार्गातील नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या 2 मे रोजी होईल, अशी माहितीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जालना ते शिर्डी या टप्प्याचेही बांधकाम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात हा टप्पाही लोकांसाठी खुला केला जाईल, असे ते म्हणाले.

वैजापूर तालुक्यात विकास कामांचे उद्घाटन

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यात 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जी टीका केली, त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं.

इतर बातम्या-

Hasan Mushrif : मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून वाद चिघळला, कोल्हापुरात भाजपचा मोर्चा

Gold Silver Price : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी तेजी; चांदीचे भाव तीन हजारांनी वाढले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.