Farmer Suicide | तणनाशकामुळे सोयाबीनचे नुकसान, उद्विग्न शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, व्हिडीओ व्हायरल
शेतकऱ्याने आपल्या शेतात तणनाशक फवारल्यामुळे त्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. याच उद्वीग्नतेतून शेतकऱ्याने थेट आम्हत्या करण्याचा इशारा दिला आहे. कैलाश काकडे असे या शेतकऱ्याचे नाव असून तो कोटनांद्रा येथील रहिवाशी आहे.
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या (Farmer) आर्थिक उत्थानासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जातात. मात्र तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थित सुधारणा होत नाही. याच कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. आता तर कृषी केंद्रातून आणलेल्या औषधानेच औरंगाबादमधील (Aurangabad) एका शेतकऱ्याचा घात केला आहे. शेतकऱ्याने आपल्या शेतात तणनाशक फवारल्यामुळे त्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. याच उद्वीग्नतेतून शेतकऱ्याने थेट आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. कैलाश काकडे असे या शेतकऱ्याचे नाव असून तो कोटनांद्रा येथील रहिवाशी आहे. आत्महत्येचा (Suicide) इशारा देणारा त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
तणनाशकामुळे सोयाबीन जळून खाक
मिळालेल्या माहितीनुसार कैलास काकडे या शेतकऱ्याने आपल्या शेतात तणनाशकाची फवारणी केली होती. मात्र या फवारणीमध्ये तणनाशकामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. त्याने हे तणनाशक कृषी केंद्रातून आणले होते. मात्र यामध्ये शेतकऱ्याने लावलेले सोयाबीन जळून खाक झाले. शेतातील उभे पीक हातातून गेल्यामुळे हा शेतकरी हताश झाला आहे.
कैलस यांचा फक्त शेतीवर उदरनिर्वाह
याच उद्विग्नतेतून शेतकऱ्याने आत्महत्येचा इशारा दिला आहे. कैलास काकडे यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झालेले आहे. त्यांच्या दोन मुलांचा उदरनिर्वाह याच शेतीवर चालतो. मात्र आता शेतातील पीक तणनाशकामुळे जळून गेल्यामुळे आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
इतर बातम्या :
Turmeric Crop: वर्षभर प्रयत्नांची पराकष्टा, आता सर्वकाही दरावर अवलंबून
केजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई