आधी कोटींच्या घोटाळ्यामुळे राज्यभर चर्चा, आता देणी थकल्यामुळे गंगापूर साखर कारखाना विक्रीला

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर साखर कारखाना अखेर विक्रीला काढण्यात आला आहे. (aurangabad gangapur sugar mill sale)

आधी कोटींच्या घोटाळ्यामुळे राज्यभर चर्चा, आता देणी थकल्यामुळे गंगापूर साखर कारखाना विक्रीला
गंगापूर साखर कारखाना
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 10:06 AM

औरंगाबाद : कित्येक कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यामुळे राज्यभर चर्चेत आलेला औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर साखर कारखाना (Gangapur Suger mill) अखेर विक्रीला काढण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेने हा कारखाना विक्रीला काढला असून तशी जाहिरातही वर्तमानपत्रांत देण्यात आलीये. सभासदांची देणी थकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Aurangabad Gangapur Sugar Mill has finally been put up for sale)

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर साखर कारखान्यामध्ये कित्येक कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यामुळे या कारखान्याच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रकरणात भाजपचे आमदार प्रशांत बंब (P rashant Bamb) यांचेसुद्धा नाव समोर आले होते. बंब यांचे नाव समोर आल्यानंतर या साखर कारखान्याची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता हाच साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेने वर्तमानपत्रांमध्ये तशी जाहिरात दिली आहे. सभासदांची देणी थकल्यामुळे हा कारखाना विक्रीस काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अचानकपणे कारखाना विक्रीची जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये झळकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.

नेमका घोटाळा काय?

गंगापूर साखर कारखाना (Gangapur Suger mill) हा औरंगाबादेतील महत्त्वाचा आणि चर्चेत राहणारा साखर कारखाना आहे. मात्र, या कारखान्यात कोटींनी घोटाळा झाल्याचा आरोप झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांनी डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण, त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. व्यवहारच रद्द झाल्यामुळे कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले असे सांगण्यात येते. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप कारखान्याचे सभासद आणि प्रशांत बंब यांच्यावर आहे.

प्रशांत बंब यांच्यासह 16 जण रडारवर

कारखान्यातील कथिक घोटाळ्याप्रकरणी औरंगाबादमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रशांत बंब गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान, गंगापूर साखर कारखान्यातील कथित घोटाळा प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झालीये. घोटाळ्याच्या चौकशीसाठी 27 फेब्रुवारी 2021 रोजी प्रादेशिक साखर संचालकांकडून लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन महिन्यांच्या काळात लेखापरीक्षकांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या घोटाळ्याचे सूत्रधार कोण, याचा उलगडा होईल, असं म्हटलं जातंय. मात्र, अचानकपणे साखर कारखाना विक्रीला काढण्याची जाहिरीत वर्तमानपत्रांमध्ये झळकल्यामुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इतर बातम्या :

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ; गंगापूर साखर कारखाना घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.