प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ, शिवसेना थेट ईडीकडे तक्रार दाखल करणार

शांत बंब यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार आहे, असे डोणगावकर यांनी सांगितले. (MLA Prashant Bamb ED complaint)

प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ, शिवसेना थेट ईडीकडे तक्रार दाखल करणार
प्रशांत बंब
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 5:45 PM

मुंबई : संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या गंगापूर साखर कारखाना घोटाळा (Gangapur Sugar mill) प्रकरणाच्या चौकशीत टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे याप्रकरणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांची ईडीकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. यामुळे प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. औरंगाबादचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी याबाबतची माहिती दिली. (Aurangabad Gangapur Sugar Mill Scam Shivsena will file complaint to ED against MLA Prashant Bamb)

गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी प्रशांत बंब यांच्यासह संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र याप्रकरणी अद्यापही ठोस कारवाई केली जात नाही, असा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी औरंगाबाद ग्रामीण पोलीस जाणीपूर्वक टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे प्रशांत बंब यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार आहे, असे डोणगावकर यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय ?

गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण, त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे. (Aurangabad Gangapur Sugar Mill Scam Shivsena will file complaint to ED against MLA Prashant Bamb)

प्रशांत बंब यांच्यासह 16 जण रडारवर

औरंगाबादमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे या गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान, गंगापूर साखर कारखान्यातील कथित घोटाळा प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. घोटाळ्याच्या चौकशीसाठी 27 फेब्रुवारी 2021 रोजी प्रादेशिक साखर संचालकांकडून लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन महिन्यांच्या काळात लेखापरीक्षकांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या घोटाळ्याचे सूत्रधार कोण, याचा उलगडा होईल, असं म्हटलं जातंय. मात्र, अचानकपणे साखर कारखाना विक्रीला काढण्याची जाहिरीत वर्तमानपत्रांमध्ये झळकल्यामुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सभासदांचा जामीन फेटाळला

दरम्यान काही महिन्यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी सहा जणांचे जामीन अर्ज फेटाळले होते. औरंगाबाद खंडपीठाचे सरकारी वकील डी आर काळे यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडताना मनी लॉन्ड्रिंग आणि खोटे दस्तऐवज तयार केल्याचे सांगितले. फिर्यादी कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे ऑडिट रिपोर्ट, पोटनियम, खोटे अधिकार पत्र, मुखत्यार पत्र बाबत सविस्तर विवेचन करुन या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने सहा जणांचे अर्ज फेटाळून लावले होते. (Aurangabad Gangapur Sugar Mill Scam Shivsena will file complaint to ED against MLA Prashant Bamb)

संबंधित बातम्या : 

आधी कोटींच्या घोटाळ्यामुळे राज्यभर चर्चा, आता देणी थकल्यामुळे गंगापूर साखर कारखाना विक्रीला

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ; गंगापूर साखर कारखाना घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.