मराठवाडा वॉटर ग्रीड योजना संकटात, योजनाला सिंचन विभागाचा तीव्र विरोध
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मराठवाडा वॉटर ग्रीड (Marathwada water grid scheme) योजना संकटात सापडली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला सिंचन विभागाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या ग्रीडमुळे जिल्ह्याजिल्ह्यांत पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यासाठी भांडणे लागण्याची भीती या सिंचन विभागाने व्यक्त केली आहे
औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मराठवाडा वॉटर ग्रीड (Marathwada water grid scheme) योजना संकटात सापडली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला सिंचन विभागाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या ग्रीडमुळे जिल्ह्याजिल्ह्यांत पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यासाठी भांडणे लागण्याची भीती या सिंचन विभागाने व्यक्त केली आहे (Aurangabad Irrigation department opposes Marathwada water grid scheme).
दरम्यान, सिंचन विभागाच्या प्रस्तावानंतर वॉटर ग्रीडवरुन राज्य सरकार बॅकफूटवर गेली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे. मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण समस्या आहे. त्यातच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
महाराष्ट्रातील हक्काचे पाणी राज्यातील जनतेला सिंचनासाठी पाणी अडविणे आणि इतर उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे.
तत्कालीन भाजप सरकारचा मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांना पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी पुरवण्याचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी तब्बल 26 हजार कोटी रुपये खर्चून ही योजना राबवण्यात येणार होती. या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील सर्व जिल्हे पाईप लाईनने जोडले जाणार होते. मात्र, सिंचन विभागाच्या विरोधानंतर ही योजना बारगळण्याची शक्यता आहे.
ठाकरे सरकारचा मराठवाड्याला दिलासा देण्याचा प्रयत्न, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला तत्वत: मान्यता https://t.co/TVJsByi2wV @AmitV_Deshmukh @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @OfficeofUT @Dev_Fadnavis @Pankajamunde #MarathwadaWaterGrid #AmitDeshmukh #Marathwada #WaterCrisis
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021
Aurangabad Irrigation department opposes Marathwada water grid scheme
संबंधित बातम्या :
राज्यात स्टेट वॉटर ग्रीड तयार करा; गडकरींचा मुख्यमंत्र्यांना सल्ला