Aurangabad | मराठवाड्यात लवकरच इलेक्ट्रिक रेल्वे, मनमाड-रोटेगाव दरम्यान प्रयोग यशस्वी
मराठवाड्यातून मुंबई, दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना मनमाड येथे डिझेलचे इंजिन काढून इलेक्ट्रिक इंजिन लावावे लागते. त्यास किमान अर्धा तास वेळ लागतो. तो वेळ भविष्यात वाचणार आहे. मनमाडपर्यंतचा प्रवासही वेगात होईल.
औरंगाबादः गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या बाबतीत पिछाडीवर राहिलेल्या मराठवाड्यातील अनेक प्रकल्प आता मार्गी लागताना दिसत आहे. मराठवाड्यातील (Marathwada) रेल्वे मार्गांचे (Railway Electrification) विद्युतीकरण हा त्यातलाच एक प्रकल्प आहे. सुरुवातीला मनमाड ते रोटेगावदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन (Electric engine) धावले आहे. पुढील टप्प्यात औरंगाबादपर्यंत इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावेल. त्यामुळे रेल्वेचा प्रवास गतिमान होण्यास मदत होईल. तसेच औरंगाबादपर्यंतचा टप्पा पूर्ण झाल्यावर मनमाड ते औरंगाबाद इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावे. डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक इंजिनवर रेल्वे धावण्यासाठी औरंगाबादपर्यंत विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
मनमाडहून मुंबईकडे जाताना इंजिन बदलावे लागते
मनमाड ते रोटेगाव हा रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यासाठी रोटेगाव येथे विद्युत टॉवर उभारले आहे. येथूनच वीजपुरवठा केला जाणार आहे. मराठवाड्यातून मुंबई, दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना मनमाड येथे डिझेलचे इंजिन काढून इलेक्ट्रिक इंजिन लावावे लागते. त्यास किमान अर्धा तास वेळ लागतो. तो वेळ भविष्यात वाचणार आहे. मनमाडपर्यंतचा प्रवासही वेगात होईल.
जालना-जळगाव रेल्वेमार्गालाही गती
दरम्यान, जालना ते जळगाव या नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्मे विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक सध्या या मार्गावरील गावांना भेटी देत आहे. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण तत्काळ करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्या होत्या त्यानुसार, गुरुवार रेल्वे सदस्यांचे गुरुवारी दाखल झाले असून या मार्गाची पाहणी करत आहे. 174 किमीच्या रेल्वे मार्गामुळे राजुरी, अजिंठा आदी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत.
इतर बातम्या-