Elections | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आदेश, मराठवाड्यात 3 मनपा, 46 नगरपालिका तर 8 जिल्हा परिषदा प्रतीक्षेत!

औरंगाबाद| सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) राज्य निवडणूक आयोगाला (Maharashtra Election commission) लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरु झाली आहे. एकाच वेळी एवढ्या ठिकाणी निवडणुका घेणे शक्य आहे की नाही, याबाबतची चाचपणी सुरु आहे. मराठवाड्यातील (Marathwada) 03 महापालिका, 08 जिल्हा परिषदा आणि 46 नगर परिषदांसह 02 नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व […]

Elections | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आदेश, मराठवाड्यात 3 मनपा, 46 नगरपालिका तर 8 जिल्हा परिषदा प्रतीक्षेत!
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 7:45 AM

औरंगाबाद| सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) राज्य निवडणूक आयोगाला (Maharashtra Election commission) लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरु झाली आहे. एकाच वेळी एवढ्या ठिकाणी निवडणुका घेणे शक्य आहे की नाही, याबाबतची चाचपणी सुरु आहे. मराठवाड्यातील (Marathwada) 03 महापालिका, 08 जिल्हा परिषदा आणि 46 नगर परिषदांसह 02 नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशसाकीय वर्तुळात सुरु आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील समर्पित आयोगाकडून ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा डेटा घेऊन सर्वोच्च न्यायालयात जायचे आणि ओबीसी आरक्षण टिकवायचे, अशी रणनीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखील झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील किती महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत हे पाहुयात-

03 महापालिका प्रतीक्षेत-

-औरंगाबाद मनपाची मुदत एप्रिल 2020 मध्येच संपली आहे. – लातूर, परभणी मनपाची मुदतही मे 2020 मध्ये संपली आहे. – नांदेड-वाघाळा मनपाची मुदत ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.

किती जिल्हा परिषदांवर प्रशासक?

औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदांवर प्रशासक काम पहात आहेत.

किती नगर परिषदा आणि नगरपंचायतींना प्रतीक्षा?

औरंगाबाद जिल्ह्यात– खुलताबाद, कन्नड, गंगापूर, पैठण बीड जिल्ह्यात– बीड, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, गेवराई, परळी हिंगोली जिल्ह्यात– कळमनुरी, हिंगोली, वसमतनगर जालना जिल्ह्यात– भोकरदन, अंबड, परतूर, जालना लातूर- अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा नांदेड- कुंडलवाडी, मुखेड, कंधार, बिलोली, देगलूर, मुदखेड, धर्माबाद, उमरी, हदगाव, भोकर उस्मानाबाद जिल्ह्यात- तुळजापूर, नळदूर्ग, भूम परंडा, मुरूम, उस्मानाबाद, कळंब, उमरगा परभणी जिल्ह्यात- सोनपेठ, पूर्णा, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू, गंगाखेड या नगरपरिषदांची मुदत संपली आहे.

– हिमायतनगरची मुदत जानेवारी 2021 मध्ये संपली आहे. – रेणापूर नगरपंचायतीची जून 2022 मध्ये संपेल. – फुलंब्री नगरपंचायतीची मुदत जानेवारी 2023 मध्ये संपेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.