Aurangabad | शहरातील MIM चे जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, पक्षाच्याच माजी नगरसेवकाची तक्रार
एमआयएमचे माजी नगरसेवक विकास प्रकाश एडके (रा. पदमपुरा) यांनी दोन पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत सिटी चौक पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला. या प्रकारामुळे एमआयएममधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
औरंगाबाद | शहरातील एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर (Sameer Sajed), पदाधिकारी मुन्शी पटेल यांच्यावर अॅट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल झाला आहे. एमआयएमच्याच (MIM) माजी नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून या दोन पदाधिकाऱ्यांनी जातिवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एमआयएमचे माजी नगरसेवक विकास प्रकाश एडके (रा. पदमपुरा) यांनी दोन पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत सिटी चौक पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला. या प्रकारामुळे एमआयएममधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
नेमके काय घडले?
पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, एमआयएमचे विकास प्रकाश एडके हे राजकारणासह जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. 2015 मध्ये ते एमआयएमकडून खडकेश्वर वॉर्डातून एससी प्रवर्गातून नगरसेवक झाले होते. 8 मार्च रोजी रात्री त्यांना त्यांच्या मित्राला मारहाण झाल्याचे कळले. हा मित्र म्हणजे कंत्राटदार सय्यद सलाउद्दीन. मित्राच्या मदतीसाठी एडके सिटी चौक पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा सय्यद सलाउद्दीन यांना हॉटेल ताजच्या बाहेर मारहाण झाल्याचे कळले. ही मारहाण समीर बिल्डर, मुन्शी पटेल, अनीस खान, सोहेल पार्टी यांनी केली तसेच इनोव्हा कारही फोडल्याचे एडके यांना कळले. एडके सिटी चौकात ही विचारपूस करत असतानाच साबेर हुसेन आणि समीर साजेद बिल्डर तेथे पोहोचले. तुम्ही याविषयी तक्रार दाखल करू नका, असा दबाव टाकला. तसेच पोलीस ठाण्याबाहेर येताच एडके यांचा समीर बिल्डरने जातीवाचक उल्लेख करत मारण्याची धमकी दिली.
‘हात-पाय तोडण्याची धमकी’
एमआयएमचे पदाधिकारी समीर साजेद बिल्डर आणि मुन्शी पटेल यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे एडके यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुमचे हात-पाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. तसेच मुन्शी पटेल यांनीदेखील जातीवाचक शिवीगाळ केली. आमच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आमचे काही करू शकले नाहीत, तुझ्या तक्रारीने काय होणार, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी सालम बावजीर, अब्दुल रहीम, शेख अश्पाक, मोहिमीन खान हेदेखील उपस्थित होते, अशी तक्रार एडके यांनी दिली आहे. आता एडके यांच्या तक्रारीवरून समीर साजेद बिल्डर व मुन्शी पटेल यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या-