Aurangabad मध्ये राजकीय खलबतं, MIM चे इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे Rajesh Tope यांची भेट, एकत्र लढण्याचे संकेत
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची धोरणं वेगळी असली तरीही महाराष्ट्रात हे पक्ष एकत्र आहेत. आता त्यात एमआयम शामिल झाल्यावर काय काय परिणाम होऊ शकतात, याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
औरंगाबादः महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणं बदलवणारी मोठी घडामोड औरंगाबादमध्ये घडली आहे. आगामी निवडणुकीत भाजपाला हरवण्यासाठी एमआयएम (MIM Offers) महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) निवडणूक लढवू शकते, अशी खुली ऑफर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल खासदार जलील यांची औरंगाबादमध्ये भेट घेतली. या बैठकीतील चर्चेदरम्यान भाजपा वारंवार विजयी होण्यामागे एमआयएमच कारणीभूत आहे, असं वक्तव्य केलं गेलं. तेव्हा खासदार जलील यांनी यापुढे असा आरोप पक्षावर केला जाऊ नये म्हणून आम्ही महाविकास आघाडीत येण्यास तयार आहोत, अशी शक्यता वर्तवली. तसेच एमआयएम काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबतही येण्यास तयार आहे, असा निरोप शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवा, असं वक्तव्यदेखील खासदार इम्तियाज जलील यांनी केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्र आले तर राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची धोरणं वेगळी असली तरीही महाराष्ट्रात हे पक्ष एकत्र आहेत. आता त्यात एमआयम शामिल झाल्यावर काय काय परिणाम होऊ शकतात, याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राजेश टोपे आणि खासदार जलील यांची भेट
खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यानिमित्त मागील आठवड्यापासून अनेक राजकीय नेते खासदार जलील यांच्या भेटीस येत आहेत. नुकतीच राष्ट्रावाद काँग्रेसने नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही खासदारांची भेट घेतली. या बैठकीत उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांत झालेल्या निवडणुकांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी भाजपच्या विजयासाठी इतर पक्ष जबाबदार आहेत, असं वक्तव्य केलं गेलं, त्यानंतर खासदार जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला.
शरद पवारांना निरोप द्या- खासदार जलील
खासदार इम्तियाज जलील यांनी राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, हे जाहीर केलं. ते म्हणाले, राजेश टोपे माझ्या घरी आले होते. बोलता बोलता ते म्हणाले, तुमच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपा जिंकली. तेव्हा मी म्हटलं, तुमच्यासाठी हे बोलणं खूप सोपं झालं आहे. जेव्हा जेव्हा MIM कुठेही निवडणूक लढवली तेव्हा तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप केला जातो. त्यामुळे आम्हीही त्यांना ऑफर दिली. चला आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. MIM भाजपची बी टीम आहे. त्यांच्यामुळे भाजपाला फायदा होतो, हे आरोप एकदाचे संपून जाऊ द्या. त्यामुळे मी स्वतःसपा आणि बसपासोबत बैठक घेतली होती. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रस्ताव देत आहोत. आता तुम्ही सांगा. तुम्ही तर सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेसोबत गेलात. मग एमआयएम का नाही? माझा एवढा निरोप शरद पवार यांना द्यावा, असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी केलं.
तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा….
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका करताना म्हटले की, तुमच्या तीन चाकी रिक्षाला आमचेही एक चाक जोडून द्या. मोटर कार करा आणि बघा ती कशी चालते… आमचे तर स्पष्ट मत आहे. भाजप देशासाठी खूप घातक ठरत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमची कोणत्याही पक्षासोबत जाण्याची तयारी आहे.
इतर बातम्या-