Aurangabad MNS: सुहास दाशरथे गटाला आणखी एक धक्का, चार कार्यकर्त्यांची मनसेतून हकालपट्टी, बदनामीचा ठपका

औरंगाबाद मनसेतील सुहास दाशरथेंना आणखी एक जबर धक्का बसला आहे. सुहास दाशरथे यांच्या गटातील चार कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Aurangabad MNS: सुहास दाशरथे गटाला आणखी एक धक्का, चार कार्यकर्त्यांची मनसेतून हकालपट्टी, बदनामीचा ठपका
औरंगाबादेत मनसेतील सुहास दाशरथे यांच्या गटाला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 9:48 AM

औरंगाबादः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. या गटातील चार कार्यकर्त्यांची हकालटट्टी मनसेने केली आहे. पक्षाला बदनाम केल्या प्रकरणी कार्यकर्त्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद मनसेतील (MNS) गटबाजी वाढली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्यातही सुहास दाशरथेंची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यामुळे ते नाराज होते. आता या गटातील कार्यकर्त्यांची थेट हकालपट्टी केल्यामुळे सहास दाशरथे यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

4 कार्यकर्त्यांची थेट हकालपट्टी

सुहास दाशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर आता त्यांच्या गटातील चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी झाल्याचे पत्रक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धाडले आहे. नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होताच ही कारवाई झाल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे. या कार्यकर्त्यांमध्ये संदीप कुलकर्णी, चेतन शर्मा, रमेश पुरी आणि दीपक पवार यांचा समावेश आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर औरंगाबाद मनसेतील कार्यकारिणीत मोठे बदल झाले. त्यानंतर लगेच ही कारवाई झाल्यामुळे मनसेत खळबळ माजली आहे.

काय लिहिलंय मनसेच्या पत्रात?

सुहास दाशरथे गटातील कार्यकर्त्यांची हकालपट्टी करणारे मनसेचे पत्रक टीव्ही 9 ला प्राप्त झाले आहे. यावर मनसेचे राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, नवनियुक्त औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, दिलीप बनकर पाटील, वैभव मिटक, बिपीन नाईक, गजन गौडापाटील, आशिष सुरडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रकात म्हटले आहे, ‘ सर्व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, संभाजीनगर येथील सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष विरोधी आणि नेत्यांच्या विरोधात चुकीची पोस्ट-वक्तव्य केल्यामुळे रमेश पुरी, चेतन शर्मा, संदीप कुलकर्णी व दीपक पवार यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. वरील बाब त्यांना वारंवार समजावून सांगूनदेखील पक्ष बदनाम होईल, असे कृत्य करित असल्यामुळे त्यांच्यावर संबंधित कारवाई करण्यात आले आहे. तरीही वरील नावांशी आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही संबंध नाही. यापुढे जर त्यांनी पक्षाचा सैनिक म्हणून कुठेही उल्लेख केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

सुहास दाशरथेंच्या निर्णयाकडे लक्ष

राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या औरंगाबाद दौऱ्यात सुहास दाशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. त्यानंतर त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली होती. राजसाहेब, माझं चुकलं तरी काय? असा सवाल त्यांनी विचारला होता. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दाशरथे यांच्यावर आणि त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांवर आता मनसेने अशी कारवाई केल्यानंतर यापुढे ते कोणता निर्णय घेतील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

जगण्याचं ओझं का वाटतंय बीडच्या शेतकऱ्यांना? वर्षभरातला आत्महत्येचा वाढता आकडा नेमकं काय खुणावतोय?

Nashik| पतंग उडवताना बाळाच्या आयुष्याची दोरी तुटली…दोन मिनिटांत होत्याचे नव्हते!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.