Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | ब्रृजभूषण सिंहांसमोर भाजपनंही भीष्माचार्यांसारखी मान झुकवलीय? वाचा प्रकाश महाजनांचे 9 मोठे सवाल!!

उद्धवजींचं भाषण पाहिलं तर सोनिया गांधींना कसं बरं वाटेल, शरद पवारांना कसं बरं वाटेल, त्यातून राज साहेबांची कशी अडवणूक करायची. म्हणून हा ब्रृजभूषणसिंग हा माणूस उभा केला, असा आरोप शिवसेनेवर प्रकाश महाजन यांनी केला.

Aurangabad | ब्रृजभूषण सिंहांसमोर भाजपनंही भीष्माचार्यांसारखी मान झुकवलीय? वाचा प्रकाश महाजनांचे 9 मोठे सवाल!!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 5:11 PM

औरंगाबादः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यात खोडा घालणाऱ्या ब्रृजभूषण सिंहांची (Brijbhushan Singh) भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं रचलेला सापळा आहे, असा आरोप मनसेकडून केला जात आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी यावर आज सविस्तर चर्चा केली.  पुण्याची सभा झाल्यावरच मी हा आरोप केला होता. पवार आणि शिवसेना मिळून हा सापळा रचत असल्याचं मी म्हटलं होतं, असं प्रकाश महाजन यांनी औरंगाबादमध्ये चर्चेदरम्यान सांगितलं. खरं तर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आम्हाला भाजपकडून वेगळी अपेक्षा होती. पण त्यांनीदेखील ब्रृजभूषण सिंहांच्या प्रकरणात मौन धारण केलेलं दिसतंय. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना भीष्माचार्यांनी ज्याप्रमाणं मान झुकवली होतं, तशीच भूमिका भाजपची असल्याचा गंभीर आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.

‘हिंदुत्व सोडताही येईना धरताही येईना’

प्रकाश महाजन यांनी शिवसेनेवर आरोप करताना म्हटलं की, शिवसेनेचीच तर सध्या खूपच गोची झाली आहे. हिंदुत्व सोडताही येईना आणि धरताही येईल. उद्धवजींचं भाषण पाहिलं तर सोनिया गांधींना कसं बरं वाटेल, शरद पवारांना कसं बरं वाटेल, त्यातून राज साहेबांची कशी अडवणूक करायची. म्हणून हा ब्रृभूषणसिंग हा माणूस उभा राहिला. त्यानीच एका मुलाखतीत सांगितलं की सुप्रियाताई संसदेत आम्हाला नाश्ता द्यायच्या. म्हणजेच ते खाल्या मिठाला जागले. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि शरद पवार इकडचे आश्रय दाते…’

हे सुद्धा वाचा

‘ममता बॅनर्जींच्या निर्णयानंतर तो संघर्ष थांबला’

प्रकाश महाजन म्हणाले, ‘उत्तर भारतीयांचा आणि मनसेचा संघर्ष होऊन जवळपास 12-14 वर्ष झाली. हा संघर्ष का झाला, याची कारणंही सबळ आहेत. महाराष्ट्रात रेल्वे विभागात नोकऱ्या होत्या. परीक्षा हिंदितून ठरवली. जाहिरात उत्तर प्रदेश व बिहारच्या वृत्तपत्रात आली. सहाजिकच तिकडचे मुलं मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर आले. आमच्या कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली आणि मग मॉब मेंटॅलिटीतून हा सगळा प्रकार झाला. त्यानंतर ममता बॅनर्जींनी योग्य निर्णय घेतला. संबंधित भागातील प्रादेशिक भाषेतच परीक्षा घेतली जाईल, असा निर्णय दिला. त्यामुळे युपीची मुलं इकडे आले नाहीत, आमची मुलं तिकडं गेले नाहीत.’

9 सवाल कोणते?

ब्रृजभूषण सिंहांच्या भूमिकेवरून प्रकाश महाजन यांनी दहा सवाल उपस्थित केले आहेत. ते असे-

  1.  राज ठाकरेंनी तुमची माफी मागावी, असे तुम्ही म्हणत आहात. अयोध्येचे लोक एवढे महान असते तर बाबरी मशिद बांधलीच नसती. बाबरी मशीद पाडायला इथूनच का लोकं जावे लागले?
  2. ज्ञानवापी मंदिर-मशीद वाद सुरु आहे. तिथं जाऊन शिवलिंग धरण्याची हिंमत आहे का?
  3. 2017 साली गुजरातमध्ये उत्तर प्रदेशच्या एका माणसाने गुजराती तरुणीवर बलात्कार केला. ही बातमी गुजरातमध्ये वाऱ्यासारखी पसरली. युपी बिहारच्या लोकांना मारून मारून बाहेर घालण्यात आलं. काही लोकं मुंबईत आली, काही लोकं आपल्या प्रदेशात गेली. हे आंदोलन करणारी प्रमुख व्यक्ती होती कल्पेश ठाकूर. याला भाजपने विधानसभेत उमेदवारी दिली. तो आमदार आहे. ब्रृजभूषणसिंगजी या गुजराती माणसाला तुम्ही अयोध्येत अडवलंत का?
  4. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच गुजरातचेय. मोदीजी वाराणसीचं प्रतिनिधित्व करतात, मग का नाही तुम्ही त्यांना अडवलं?
  5. अडवायचं होतं तर राम मंदिराचा शिलान्यास होता तर तेव्हाच तुम्ही का नाही भूमिका घेतली?
  6. उद्या आम्ही ठरवलं उत्तर प्रदेश-बिहारींना महाराष्ट्रात येऊ द्यायचं नाही, तर चालेल का?
  7. काल हा ब्रृजभूषण सिंग योगींच्या गोरखपूर मतदार संघात होता. त्याची कशी भाषा होती. ते आव्हान योगी सरकारला आहे. महाराष्ट्रातून 5 जूनला लखनौच्या विमानतळावर उतरलं तर त्याला आम्ही जीवे मारू. योगी सरकारनं त्यावर काय कारवाई केली?
  8. म्हणूनच शरद पवारांसोबतच भाजपनेही या गोष्टीकडे कानाडोळा केलाय का?
  9.  ब्रृजभूषण सिंहांच्या प्रकरणात भाजप मौन का राखतंय ? द्रौपदीचं वस्त्रहरण होताना भीष्माचार्य खाली मान घालून बसला, तशीच भूमिका भाजपची आहे का?
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.