Marathi News Maharashtra Aurangabad Aurangabad MP Imtiaz Jalil's son Bilal Jalil and Shiv Sena leader Aditya Thackeray meet in London trolled by MNS and BJP
Aurangabad | MIM आणि शिवसेनेची पुढची पिढी लंडनमध्ये एकत्र! विरोधक म्हणतात, हे तर ‘वाघाचं हिरवं हिंदुत्व’
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने परदेशात आहेत. याच दरम्यान त्यांनी लंडनमध्ये इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील यांची भेट घेतली.
औरंगाबादः औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचे पुत्र बिलाल जलील आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeay) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची लंडनमध्ये भेट झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारण एकमेकांचे पक्के वैरी असलेल्या या पक्षांच्या नेत्यांची पुढची पिढी अशा प्रकारे एकत्र भेटल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लंडनमध्ये दोघेही वैयक्तिक कामांसाठी गेले असताना आदित्य ठाकरे आणि बिलाल जलील यांनी परस्परांची भेट घेतली. आदित्य आणि बिलाल यांच्या भेटीचे हे फोटो सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल होत आहेत. तर मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून इंटरनेटवर ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत.
#वाघाचं_हिरवं_हिंदुत्व ?
संभाजीनगर चे खासदार इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील यांच्याशी लंडन येथे प्रखर हिंदुतवा वर गहन चर्चा करतांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे. pic.twitter.com/TClQ7B8gy6
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने परदेशात आहेत. याच दरम्यान त्यांनी लंडनमध्ये इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील यांची भेट घेतली. आदित्य आणि बिलाल यांच्यातील बैठक साधारण 20 मिनिटं चालली. यानंतर त्यांनी परस्परांचा निरोप घेतला. या भेटीचे त्यांनी फोटोही काढले. प्रखर हिंदुत्ववादी शिवसेना आणि कट्टर एमआयएम यांच्यातील शत्रुत्व अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र राजकारणातील पारंपरिक शत्रूत्व बाजूला ठेवत दोन भिन्न विचारसरणीच्या युवा नेत्यांची ही भेट सध्या चर्चेत आहे.
औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे चिरंजीव बिलाल जलील यांनी लंडनमधील एका कार्यक्रमात शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
दरम्यान, आदित्य ठाकरे आणि बिलाल ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसेकडून प्रचंड टीका होत आहे. नेटकऱ्यांनी दोघांचे फोटो शेअर करत ‘वाघाचं हिरवं हिंदुत्व’ अशी टिप्पणी केली आहे. लंडनमध्ये या दोन नेत्यांनी हिंदुत्वावर गहन चर्चा केली असल्याची उपहासात्मक टीकाही काही यूझर्सनी केली आहे.