Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबाद महापालिकेचा हेल्पलाइन नंबर सुरू, तक्रार असल्यास बिनधास्त फोन करा, 24 तास उपलब्ध!

औरंगाबाद महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईनवर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे संबधित प्रश्नांसाठी व मदतीसाठी नागरिक कॉल करू शकतात.

Aurangabad | औरंगाबाद महापालिकेचा हेल्पलाइन नंबर सुरू, तक्रार असल्यास बिनधास्त फोन करा, 24 तास उपलब्ध!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 9:31 AM

औरंगाबादः स्मार्ट सिटीतर्फे औरंगाबाद (Smart Citi Aurangabad) महापालिकेसाठी हेल्पलाइन (Aurangabad helpline) नंबर सुरु करण्यात आला आहे. मनपा संबंधित कोणतेही प्रश्न विचारायचे असल्यास नागरिकांच्या मदतीसाठी 24 तास हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी मदतीचा हात सदैव उपलब्ध असेल, असे आश्वासन महापालिकेतर्फे (Municipal Corporation) देण्यात आले आहे. सोमवारी ही सेवा लाँच करण्यात आली. हा उपक्रम स्मार्ट सिटीच्या इ गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोणत्याही वेळी फोन करू शकता…

मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा ई गव्हर्नन्स प्रकल्प हाती घेतला आहे. ह्या प्रकल्पाद्वारे सेवेचा अधिकार अधिनियम अंतर्गत मनपा संबधित सर्व सेवा नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम रित्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. नागरिकांना मनपा कडून पुरवल्या जाणाऱ्या सेवेंबद्दल काही प्रश्न असतील किंवा मदतीची गरज असेल तर नागरिक कुठल्याही वेळी 08069092200 या हेल्पलाईन वर संपर्क साधू शकतात. सोमवारी औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते ही हेल्पलाईन लॉन्च करण्यात आली.

कोण-कोणत्या प्रश्नांचे निवारण?

या हेल्पलाईन वर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे संबधित प्रश्नांसाठी व मदतीसाठी नागरिक कॉल करू शकतात. एकदा कॉल केल्यावर मनपा प्रतीनिधी नागरिकांचे प्रश्न किंवा समस्येची ऑनलाइन नोंद करून घेतील आणि लगेच निवारण होत नसेल तर संबधित विभागाच्या कर्मचाऱ्याला यासाठी नेमण्यात येईल. स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी ही माहिती दिली. ठराविक वेळेवर निवारण झाले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती समस्या जाईल. ह्या हेल्पलाईनचे संचालन स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथून करण्यात येईल.  यावेळी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपायुक्त संतोष टेंगळे, नगररचना विभाग प्रमुख ए. बी. देशमुख, उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त सोमनाथ जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा, स्मार्ट सिटीचे सेक्टर लीड एम. बी. काझी, प्रकल्प अभियंता फैज अली, प्रकल्प सहयोगी किरण आढे, माध्यम विश्लेषक अर्पिता शरद उपस्थित होते.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.