Aurangabad | पावसाळ्यापूर्वी महापालिकेची तयारी, शहरातील नालेसफाईचं काम सुरु, 101 नाल्यांची स्वच्छता करणार

नियोजनबध्द पद्धतीत नाले सफाई केल्यामुळे मागील वर्षी मुसळधार पावसामुळे झालेला प्रकार टाळता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी औरंगाबाद शहरात तुफान पाऊस झाला होता. त्यामुळे नाल्यात, शहरात सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते.

Aurangabad | पावसाळ्यापूर्वी महापालिकेची तयारी, शहरातील नालेसफाईचं काम सुरु, 101 नाल्यांची स्वच्छता करणार
शहरात नालेसफाईच्या कामाला सुरुवातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 3:46 PM

औरंगाबाद: मनपातर्फे शहरातील (Aurangabad city) नाल्यांचा सफाईचे काम नेहमीपेक्षा एक महिना आधी सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वर न देता हा कार्य मनपाच्या (Municipal corporation) यंत्रणेद्वारा करण्यात येत आहे. योग्य नियोजनामुळे हे काम कमीत कमी खर्चात आणि उत्तमरित्या पार पडत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय (Astik kumar Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहरात पावसाळ्याच्या दृष्टीने नाल्यांची साफसफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 3 मार्च पासून या कामाला सुरुवात झाली आहे. हे कार्य शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता बी. डी. फड ह्यांचा नेतृत्वाखाली, यांत्रिकी विभागाचे देविदास आणि वार्ड अभियंता हे काम पाहत आहेत. गरजेनुसार मोठ्या नाल्यांमध्ये मशिनरी वापरून सफाई होत आहे व छोट्या नाल्यांमध्ये फावडा व अन्य उपकरण वापरून सफाई होत आहे.

शहरातील 101 नालेसफाईचं काम हाती

शहरातील झोन क्रमांक 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9 मध्ये कामास सुरुवात करण्यात आली आहे. शहरात 115.55 किलोमीटरचे 101 नाले आहेत. या नाल्यांची साफसफाई करून पावसाळ्यासाठी सज्ज राहण्याच्या प्रयत्नात मनपा आहे. प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी कॉन्ट्रॅक्ट न देता मनपा स्वतःची यंत्रणा वापरत आहे. यामध्ये 3 जेसीबी, 1 पोकलेन आणि 3 टिप्पर यांचा समावेश आहे. ही उपकरणे आवश्यकतेनुसार प्रत्येक झोन मध्ये काम करतात. शहरातील ज्या भागात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे तक्रारी येतात त्या भागांमध्ये सर्वात आधी काम सुरू करण्यात आलेले आहे. नाल्यातील घाण काढून नाले व्यवस्थित वाहतील याची व्यवस्था करण्यात येत आहे. हे कार्य शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता बी. डी. फड ह्यांचा नेतृत्वाखाली, यांत्रिकी विभागाचे देविदास आणि वार्ड अभियंता हे काम पाहत आहेत. गरजेनुसार मोठ्या नाल्यांमध्ये मशिनरी वापरून सफाई होत आहे व छोट्या नाल्यांमध्ये फावडा व अन्य उपकरण वापरून सफाई होत आहे.

पावसाळ्यापूर्वीची तयारी

नियोजनबध्द पद्धतीत नाले सफाई केल्यामुळे मागील वर्षी मुसळधार पावसामुळे झालेला प्रकार टाळता येईल. मागील वर्षी औरंगाबाद शहरात तुफान पाऊस झाला होता. त्यामुळे नाल्यात, शहरात सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. ह्या वर्षी मनपाच्या स्वतःची यंत्रणा लावून हे काम एक महिना आधीच सुरु केले आहे. ही मोहीम म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या ‘रेस टू रेसिल्यन्स’ अभियान अंतर्गत शहराला हवामान बदलासाठी तयार करण्याचे एक पाऊल आहे, असं वक्तव्य महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी केलं आहे.

इतर बातम्या-

Railway | मराठवाड्यातला महत्त्वाचा रेल्वेमार्ग, जालना-जळगाव मार्गाच्या सर्व्हेसाठी पथक दाखल, विविध गावांना भेटी देणार

केंद्र सरकारच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद, यंदाच्या हंगामापासून Zero Budget शेतीचा प्रयोग

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.