Aurangabad | महापालिकेची निवडणूक कधी? इच्छुकांची प्रतीक्षा पणाला, विलंबाची कारणं काय?

महापालिकेची सार्वजनिक निवडणूक एप्रिल 2019 मध्ये होणार होती. मात्र कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. त्यानंतर वॉर्ड रचनेच्या विरोधात काही नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीबाबत जैसे थे आदेश दिले होते.

Aurangabad | महापालिकेची निवडणूक कधी? इच्छुकांची प्रतीक्षा पणाला, विलंबाची कारणं काय?
औरंगाबाद महापालिकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः शहरातील महापालिका निवडणुकांमधील (Aurangabad municipal corporation) कायदेशीर अडसर दूर झाला आहे. तरीही निवडणुकांच्या दृष्टीने सध्या म्हणाव्या तेवढ्या हालचाली दिसून येत नाहीयेत. कारण महापालिका निवडणुका (Election) एवढ्यात होण्याची शक्यता कमी आहे. महापालिकेच्या निवडणुकीआधी प्रभाग रचनेचा आराखडा आणि मतदार याद्या (Voters list) अंतिम करणे आवश्यक आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन ते सव्वा दोन महिने लागतील. त्यानंतर येतोय पावसाळा. या काळात निवडणुका घेता येत नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी थेट हिवाळा म्हणजे ऑक्टोबर महिनाच उजाडू शकतो, असे बोलले जात आहे. त्यामुळे यंदाची महापालिका गाजवूनच दाखवणार, या इच्छेला पेटलेल्या उमेदवारांची पुरती निराशा होत आहे. निवडणुकांची वाट पाहणाऱ्या इच्छुकांची प्रतीक्षाच जणू पणाला लागली आहे.

वाट पाहून इच्छुकही थकले

महापालिकेची सार्वजनिक निवडणूक एप्रिल 2019 मध्ये होणार होती. मात्र कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. त्यानंतर वॉर्ड रचनेच्या विरोधात काही नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीबाबत जैसे थे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुका एकसदस्यीय ऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आधीची वॉर्ड रचना आपोआपच रद्द झाली. सुप्रीम कोर्टानंही हे प्रकरण निकाली काढलं. तरीही निवडणुकीची सर्व प्रक्रिया पावसाळ्या आधी पूर्ण होणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एवढ्या दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुकही निवडणुकांची वाट पाहून थकले आहेत. आता त्यांना कार्यकर्ते सांभाळणंही कठीण झालं आहे.

का लांबणीवर निवडणूक?

  •  निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि मतदार याद्या अंतिम कराव्या लागतात. ही प्रक्रिया तीन टप्प्यात राबवली जाते.
  • यापूर्वी ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबनली जात होती. आता हे अधिकार नगरविकास विभागाकडे आहेत. त्यानुसार, सुरुवातीला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो नगर विकास खात्याकडे सादर होईल.
  • शासनाच्या नगर विकास खात्याकडून हा कच्चा आराखडा व आरक्षण सोडत प्रसिद्ध होईल. त्यावर सूचना व हरकती मागवण्यात येतील. प्राप्त सूचना व हरकतींवर सुनावणी घेण्यात येईल.
  • सुनावणनंतर आराखड्यात योग्य ते बदल करून अंतिम आराखडा प्रसिद्ध होईल. पुढील टप्प्यात मतदार याद्या प्रभागनिहाय फोडण्याचे काम हाती घेतले जाईल. ते झाल्यावर प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर सूचना व हरकती मागवल्या जातील. त्यानंतर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील.
  • या सर्व प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालवाधी लागतो. त्यानंतर निवडणूक घ्यायची ठरले तरी तो कालावधी पावसाळ्यात येतो.
  •  शासनाच्या नियमानुसार, निवडणूक घेता येत नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच निवडणूक होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

इतर बातम्या 

Lemon Production: मागणी वाढली अन् उत्पादन घटलं, नैसर्गिक संकटाने सर्वकाही हिरावलं

Sahdeo Dirdo video : ‘बचपन का प्यार’फेम ‘सहदेव दिर्दो’नं केली ‘बच्चन पांडे’ची कॉपी, म्हणाला…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.