Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | शहरात महापालिकेचे लवकरच 4 मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आणखी कोणत्या कामांना गती?

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या या कामासाठी 10 टक्के कमी दराची हायटेक इन्फ्राटेक प्रा. लि. कंपनीची निविदा अंतिम करण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटीचे प्रकल्प समन्वयक इम्रान खान यांनी दिली.

Aurangabad | शहरात महापालिकेचे लवकरच 4 मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आणखी कोणत्या कामांना गती?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 6:00 AM

औरंगाबाद| शहरातील नागरिकांना स्मार्ट सोयी सुविधा देण्यासाठी स्मार्ट सिटी (Smart city) योजनांच्या माध्यमातून विविध कामांना गती देण्यात आली आहे. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे शहरात जवळपास 4 मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (Multispecialty hospital) उभारण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या वतीने यासाठी 31 कोटी 62 लाख रुपये अंदाजे किंमत असलेल्या निविदा काढण्यात आल्या आहेत. तसेच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या या कामासाठी 10 टक्के कमी दराची हायटेक इन्फ्राटेक प्रा. लि. कंपनीची निविदा अंतिम करण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटीचे प्रकल्प समन्वयक इम्रान खान यांनी दिली. त्यामुळे आगामी काही वर्षात शहरातील (Aurangabad city) नागरिकांना कमी खर्चात अद्ययावत आरोग्य सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्या चार ठिकाणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल?

– सिडको एन-7 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर – सिडको एन-2 – सिडको एन- 11 – सातारा परिसर या चार ठिकाणी महापालिकेचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीने जवळपास 32 कोटी रुपयांची निविदा काढली आहे.

हायटेक इन्फ्राटेक प्रा. लि. कंपनीकडे काम

शहरातील चार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीच्या कामासाठी चार कंत्राटदार एजन्सीच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १०.३५ टक्के कमी दराने आलेली हायटेक इन्फ्राटेक प्रा. लि. कंपनीची निविदा अंतिम करण्यात आली. यावेळी अजयदीप कंस्ट्रक्शन, वंडर कंस्ट्रक्शन, बाबा कंस्ट्रक्शन या तीन कंत्राटदार एजन्सीच्या निविदादेखील आल्या होत्या. मात्र या कंत्राटदार एजन्सीच्या निविदेतील किंमत ही हायटेक इन्फ्राटेक पेक्षा जास्त असल्यामुळे त्या नाकारण्यात आल्याचे प्रकल्प समन्वयक इम्पान खान यांनी सांगितले.

शहरातील आणखी कोणत्या कामांना गती?

स्मार्ट रस्ते, स्मार्ट आरोग्य, स्मार्ट शिक्षणाच्या माध्यमातून शहरवासियांना सोयी सुविधा देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत प्रयत्न सुरु आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विविध कामांच्या निविदांना नुकतीच मंजुरी देण्यात आली. यातील काही कामे पुढीलप्रमाणे- – महापालिकेच्या 50 शाळांची दुरूस्त स्मार्ट सिटीच्या निधीतून केली जाणार आहे. स्मार्ट स्कूल ही संकल्पना हाती घेऊन या शाळांतील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी विक्रम इन्फ्राटेक प्रा. लि. कंपनीची 29.72 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

– सफारी पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यादेश 55 कोटी 50 लाख रुपयांमध्ये के. एच. कंस्ट्रक्शनला देण्यात आले आहे. – क्रांती चौक उड्डाणपूल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विद्युत रोषणाईचे काम विन सेमींकडक्टर कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 51.81 लाख रुपये लागणार आहेत. – शहरातील संत तुकाराम नाट्यगृहाच्या इलेक्ट्रिक कामासाठी 51.66 लाख रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मातोश्री इलेक्ट्रिकल आणि वायंडिंग वर्कला देण्यात आले आहे. – तर संत तुकाराम नाट्यगृहातील लाईट आणि साऊंड सिस्टिमचे 2.01 कोटींचे काम जे. डी. इंटरप्राइजला देण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Nanded | मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख, 9 एप्रिलपासून होट्टल महोत्सव, 3 दिवस कोणते कार्यक्रम?

Corona Vaccination: प्रीकॉशनरी डोससंदर्भात मोठी बातमी! 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना घेता येणार डोस, पण…

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....