AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | स्वबळावर लढण्याची तयारी, पण सदस्य नोंदणी थंडच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय दिल्या सूचना?

नाना पटोले यांनी औरंगाबादच्या ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघ निहाय सदस्यांच्या नोंदणीचा आढावा घेतला. वैजापूरात सर्वात कमी सदस्य संख्या आढळून आली.

Aurangabad | स्वबळावर लढण्याची तयारी, पण सदस्य नोंदणी थंडच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय दिल्या सूचना?
औरंगाबादेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 28, 2022 | 9:39 AM
Share

औरंगाबादः आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केलीय मात्र प्रत्यक्ष सभासद नोंदणीचे (Congress member registration) चित्र अतिशय सुस्तावलेले दिसत आहे. काँग्रेसने औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) प्रत्येक मतदार संघात किमान 25 हजार नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. पण औरंगाबाद जिल्ह्यातील 6 ग्रामीण विधानसभा मतदार संघात केवळ 9,952 जणांनीच नोंदणी केली आहे. काँग्रेसचे सभासद नोंदणी यंदा डिजिटल पद्धतीने सुरु आहे. या नोंदणीचा वारंवार आढावा घेतला जात आहे. मात्रा नोंदणीचा आकडा काही अपेक्षेनुसार वाढताना दिसत नाहीये. त्यामुळे काम न करणारे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. काल रविवारी काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणीची आढावा बैठकण औरंगाबाद येथील जिमखाना क्लबमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते.

स्वबळाची तयारी, सदस्य नोंदणी कमीच

नाना पटोले यांनी औरंगाबादच्या ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघ निहाय सदस्यांच्या नोंदणीचा आढावा घेतला. यात पुढील प्रमाणे सदस्य नोंदणी आढळून आली. वैजापूरात सर्वात कमी सदस्य संख्या आढळून आली. यापूर्वीदेखील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी केंद्रय मंत्री पल्लम राजू यांनी सदस्य नोंदणीचा आढावा घेतला होता. मात्र त्यानंतरही फारशी वाढ झालेली नाही. वैजापूर- 187 फुलंब्री- 5628 गंगापूर- 1961 पैठण- 1390 सिल्लोड- 402 कन्नड 385 एकूण- 9, 952

नाना पटोलेंनी काय दिल्या सूचना?

– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सदस्य नोंदणी कमी झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, आपल्याकडे एकही आमदार, खासदार नसल्याची तक्रार लोक करतात. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी केल्यास आपली सदस्यसंख्या वाढेल. 2014 मध्ये आपल्याला स्वबळावर लढावे लागले. त्यात अनेकांना किती मते पडली, हे माहिती आहे. विधानसभा क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान होईल. पण काम न करणाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात येईल. – नाना पटोले म्हणाले, लोक काँग्रेसचे सदस्य होण्यास इच्छुक आहेत. मात्र काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकांपर्यंत जात नाहीत. आपण राज्यात 50 लाखांपेक्षा जास्त नोंदणी करणार आहोत. सध्या 19 लाख डिजिटल सदस्य नोंदणी झाली असून 4 दिवसात हा आकडा आणखी वाढणार आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही उत्साहाने काम करून सदस्य नोंदणी वाढवावी.

इतर बातम्या-

Oscar 2022: भडकलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली; उपस्थितांना बसला आश्चर्याचा धक्का!

Beed : क्षीरसागर काकांचा पुतण्याला धक्का, राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या गळाला, जयदत्त क्षीरसागरांची खेळी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.