Aurangabad | शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध, औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं

औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा तीव्र निषेध केला. त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Aurangabad | शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध, औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं
औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 12:53 PM

औरंगाबाद| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध औरंगाबादमध्ये आज व्यक्त करण्यात आला. औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी एकत्र येत या हल्ल्याचा निषेध केला. शहरातील गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन (Aurangabad Agitation) केलं. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचाही जोरदार निषेध करण्यात आला. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध राज्यभरात सर्वच ठिकाणी होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध शहरांमध्ये गुणरत्न सदावर्तेंचा निषेध केला जातोय. एसटी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे हिंसक होण्यामागे गुणरत्न सदावर्ते यांचे प्रक्षोभक भाषण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधीची चौकशी पोलिसांकडूनही सुरु आहे.

गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध

औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा तीव्र निषेध केला. त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गुणरत्न सदावर्तेंवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. शहरातील गांधी पुतळ्याजवळ सुरु असलेल्या या आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काय आहे नेमके प्रकरण?

मागील सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. याकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महाराष्ट्रातील जनतेचे मागील अनेक महिन्यांपासून हाल सुरु आहेत. त्यामुळे असंख्य कर्मचाऱ्यांवर महामंडळाने मेस्मा अंतर्गत कारवाईदेखील केली आहे. आझाद मैदानावर सुरु असलेल्या या आंदोलनाच्या संदर्भाने उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला असून 22 एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांनी सेवेत रूजू झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासित करण्यात आले. मात्र 8 एप्रिल रोजी आझाद मैदानावरील शेकडो आंदोलक अचानक शरद पवार यांच्या घरासमोर जमले आणि त्यांनी पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक सुरु केली. ऐन वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी करून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळात पोलीसही घटनास्थळी आले आणि आंदोलकांची धरपकड सुरु झाली.

अॅड. गुणरत्न सदावर्तेंना अटक

एसटी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे भडकवण्यामागे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा हात असल्याचा संशय आहे. त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच आंदोलनाला हिंसक वळण मिळाले, असा आरोप केला जातोय. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काल मुंबई पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली असून पुढील दोन ते तीन दिवस त्यांची चौकशी केली जाईल, अशी शक्यता आहे.

इतर बातम्या-

Wardha Mahavitaran | वीजजोडणी नसताना शेतकऱ्याला 20 हजारांचे देयक; पोहणा येथे वीज कंपनीचा मनमानी कारभार

साताऱ्यात Sharad Pawar यांच्या उपस्थितीत होणार केसरी कुस्ती स्पर्धेचे अंतीम सामने

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.