Video | आईची काळजी मुलानाच असणार; मित्राची आई खड्यात पडली म्हणून जेवणाच्या डब्यातून माती आणून खड्डे…
शाळेला सोडायला येणारी मित्राची आई रस्त्यातील खड्यामुळे दुचाकीवरून पडून जखमी झाली. म्हणून विद्यार्थ्यांनी नामी शक्कल लढवत थेट खड्डे बुजवण्याचाच निर्णय घेतला.
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ मोठ्या घोषणा करून राज्यातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात मोठ मोठ्या घोषणा झाल्या तरी जनसामान्यांच्या समस्या काही कमी झाल्या नाहीत. त्या वाढतच आहेत. राज्यातील शेतकरी, युवक, महिला आणि नागरिक अनेक समस्यांना बेजार आहेत. राज्यातील अनेक गावांमध्ये आता रस्त्यांच्या समस्या आहेत. रस्ते खराब असल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. औरंगाबादमध्ये खराब रस्त्यांच्या दुर्देशेमुळे शाळेला सोडण्यासाठी येणारी महिला दुचाकीवरून खाली पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राची आई खड्यात पडल्यामुळे विद्यार्थ्यांनीच खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला.
शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला खरा पण मातीने खड्डे बुजवण्यातही आले मात्र ते सगळे खड्डे त्यांनी जेवणाच्या डब्यातून माती आणून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या प्रयत्नामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असले तरी कुंभकर्णासारख्या झोपलेलेल्या प्रशासनाला आता जागं करणार कोण असा सवाल आता संभाजीनगरकर विचारत आहेत.
औरंगाबाद शहराचे मोठ्या थाटात छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आले. त्याचा जल्लोषही जोरदारपणे करण्यात आला. मात्र शहरातील समस्या सुटणार कधी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कधी पाण्याचा तर कधी रस्त्यांचा प्रश्न डोके वर काढतो आहे. अशा एक ना अनेक समस्यांमुळे संभाजीनगरमधील नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे या सुधारणा कधी होणार असा सवालही उपस्थित केला जातो आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांनी आपल्या मित्राची आई रस्त्यातील खड्यामुळे पडली हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणाकडे तक्रार न करता थेट आपल्या चिमुकल्या हातानी जेवणाच्या डब्यात माती भरून रस्त्यातील खड्डे बुजवण्याचं काम केले आहे. तरीही याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे.
शाळेला सोडायला येणाऱ्या मित्राची आई खड्यामुळे रस्त्यात पडली हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी शाळा सुटल्यानंतर जेवणाच्या डब्यातून त्यांनी रस्त्यातील खड्डे बुजवायला सुरुवात केली.
विद्यार्थ्यांची ही कृती पाहून रस्त्यातून येणारे जाणाऱ्या नागरिकांनी विद्यार्थ्यांना विचारले असता मित्राची आई रस्त्यातील खड्यामुळे पडली म्हणून आम्ही आता जेवणाच्या डब्यातूनही माती आणून खड्डे बुजवणार असल्याचे विद्यार्थी सांगत आहे.
विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे आता कौतूक होत असले तरी लोकांमधून प्रशासनाबाबत मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.