Aurangabad | जिल्हात पुन्हा नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल, नो रेशन, निर्बंध हटवण्यासाठी लसीकरणावर भर, वाचा नवी नियमावली!

राज्य शासनाच्या निकषानुसार, जिल्हा कोरोना निर्बंधमुक्त होण्यासाठी 90 टक्के लोकांनी पहिला तर 70 टक्के लोकांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात पहिला डोस 82.97 टक्के लोकांनी घेतला आहे. तर दुसरा डोस फक्त 53.71 टक्के लोकांनी घेतला आहे.

Aurangabad | जिल्हात पुन्हा नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल, नो रेशन, निर्बंध हटवण्यासाठी लसीकरणावर भर, वाचा नवी नियमावली!
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:36 AM

औरंगाबादः कोरोना रुग्णांचे घटते प्रमाण आणि लसीकरणाचा (Corona Vaccination) टक्का या दोन निकषांवर राज्यातील 14 जिल्ह्यांवरील निर्बंध महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) हटवले आहेत. मात्र औरंगाबाद जिल्हा लसीकरणात मागे राहिल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध अद्याप कायम आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector Office) वतीने पुन्हा एकदा लसीकरणावर भर देत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात आजपासून म्हणजेच 8 मार्च पासून नवे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस घेतले असतील तरच पेट्रोल, डिझेल, रेशन, गॅस मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे.

नवे नियम काय?

– 8 मार्च पासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल मिळेल. – रेशनच्या दुकानावरदेखील लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील तरच साहित्य मिळेल. – लसीकरण नसेल तर दारूदेखील दिली जाणार नाही. – शॉपिंग मॉल, सुपरमार्केट, डी मार्ट, रिलायन्स आणि मोठ्या दुकानांमध्ये दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक असेल. या ठिकाणी भरारी पथक तपासणी करणार आहे. – शहरातील पेट्रोल पंपांवरदेखील लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी तैनात केलेले असतील, ते जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती देतील.

जिल्ह्याचे लसीकरणाचे उद्दिष्ट काय?

राज्य शासनाच्या निकषानुसार, जिल्हा कोरोना निर्बंधमुक्त होण्यासाठी 90 टक्के लोकांनी पहिला तर 70 टक्के लोकांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात पहिला डोस 82.97 टक्के लोकांनी घेतला आहे. तर दुसरा डोस फक्त 53.71 टक्के लोकांनी घेतला आहे. पहिला डोस 5 लाख 95 हजार तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 31 हजार एवढी अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही लसीकरणाचा टक्का वाढलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल, नो रेशनची घोषणा करण्यात आली आहे.

इतर बातम्या-

अंबरनाथच्या बॉडीबिल्डरचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका, बारकू पाड्यातल्या प्रणवचं यश, ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत दुसरा क्रमांक

कपिल पाटलांची भाषणं दोन दिवस यूट्यूबवर ऐकत होतो, पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराची मिश्किल टिपणी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.