निमंत्रण पत्रिकेत नाव नाही, अंबादास दानवे म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद पेटला आहे. त्यावर अंबादास दानवे यांनी आपलं मत मांडलं आहे.
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या अनावरणाचा वाद पेटला. निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचंही नाव पत्रिकेत नसल्यामुळे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. यावर दानवेंनी उत्तर दिलं आहे. विद्यापीठातील पुतळा बसविण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी विशेष प्रयत्न केले आहेत. पण उच्च शिक्षण विभाग आणि कुलगुरूंनी यात राजकारण केल्याचं दिसत आहे. मुक्तीसंग्राम दिनी दिल्लीचे पातशहा हैदराबादला येणार आहेत. त्यांच्यासाठी औरंगाबादच्या मुक्तीसंग्राम कार्यक्रमाचा वेळ बदलला आहे, असं दानवे म्हणालेत. समृद्धी महामार्गावर 3 हजार पासून ते 7 हजार पर्यंत टोल लावण्यात आला आहे, हा टोल सर्वसामान्यांना परवडणारा नाही, विमानाच्या तिकिटापेक्षा जास्त टोल महामार्गावर लावण्यात आला आहे, त्यामुळे या टोलचा पुनर्विचार झाला पाहिजे, असंही ते म्हणालेत.