Aurangabad | गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी बांबू हाऊस उभारणार, औरंगाबादच्या वैभवात आणखी भर, काय आहे योजना?
अंदाजे 1 हजार 500 स्क्वेअर फूट आकाराचे बांबू हाऊस बांधले जाईल. या हाऊसची उभारणी सीएसआर फंडातून करण्यात आली असून बांबू हाऊस परिसरात ध्यानधारणेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. बांबू हाऊसमध्ये ध्यानधारणेसाठी चार कक्ष बांधण्यात आले आहेत.
औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (BAMU) गोगा बाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरदाजवळ एक सुंदर बांबू हाऊस (Bamboo House) उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी नुकतीच या प्रकल्पाविषयी माहिती दिली. त्यामुळे औरंगाबादचं सौंदर्य अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना इथे आणखी एका लोभस वास्तुचे दर्शन घडणार आहे. ट्रेकिंग आणि निसर्ग पर्यटनाची आवड असलेल्या असंख्य नागरिकांचा ओढा गोगा बाबा टेकडीकडे असतो. यातच आता हे बांबू हाऊस झाल्यावर येथील पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ‘अटल बांबू मिशन’ अंतर्गत विविध योजना आखल्या आहेत. शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळाले, बहुपयोगी बांबू लागवडीला चालना मिळावी, यासाठी औरंगाबादमध्ये या बांबू हाऊसची उभारणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कसे असेल बांबू हाऊस?
– औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या संकल्पनेतून गोगाबाबा टेकडी परिसरात बांबू हाऊसची उभारणी केली जात आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोगा बाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराजवळ हे बांबू हाऊस उभारण्यात येणार आहे. – या योजनेत अंदाजे 1 हजार 500 स्क्वेअर फूट आकाराचे बांबू हाऊस बांधले जाईल. – या हाऊसची उभारणी सीएसआर फंडातून करण्यात आली असून बांबू हाऊस परिसरात ध्यानधारणेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. -बांबू हाऊसमध्ये ध्यानधारणेसाठी चार कक्ष बांधण्यात आले आहेत. – साधारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या बांबू हाऊसचे उद्घाटन होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली. काही दिवसांपूर्वी शहराच्या दौऱ्यावर आलेल्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनाही ही संकल्पना आवडल्याचे सूत्रांनी सांगितले.
बांबू हाऊसचा उद्देश काय?
शेतीपूरक व्यवसाय म्हणून बांबू लागवडीकडे बघितले जाते. बांबू हा बहुपयोगी व स्वयं रोजगाराच्या संधी निर्माण करणारा असून बांबू लागवडीस अधिक प्रोत्साहन मिळावे, हा या हाऊस बांधणीमागील उद्देश आहे. केंद्र सरकारने ‘अटल बांबू मिशन’ अंतर्गत विविध योजना आखल्या आहेत. शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळाले, बहुपयोगी बांबू लागवडीला चालना मिळावी, यासाठी औरंगाबादमध्ये या बांबू हाऊसची उभारणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
इतर बातम्या-