औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला आता फक्त काही तास उरले आहेत. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज महाराष्ट्र दिनी होणारी राज ठाकरे यांची सभा ऐतिहासिक असेल, असा दावा मनसेकडून (MNS) करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या एकानंतर एक अशा विजयी सभा गाजवलेलं हे मैदान आज राज ठाकरे यांच्या सभेनं भरणार असून पुन्हा एकदा ठाकरी आवाज येथे घुमणार आहे. औरंगाबाद हा शिवसेनाचा बालेकिल्ला होता… तो भूतकाळ होता, सध्याचं चित्र वेगळं आहे. बहुतांश औरंगाबादकर शिवसेनेच्या कामगिरीवर नाराज आहे, अशी टीका मनसेकडून करण्यात येतेय. तर हा राज ठाकरेंनी कितीही जनसमुदाय जमवला तरीही ते केवळ नकला पाहण्यासाठी येतील, औरंगाबादमधील शिवसेनेचं स्थान अढळ आहे, असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे. एकूणच, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवरील नाराजी कॅश करण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचं शस्त्र हाती घेतलं असून मुंबई, ठाणे, पुण्यानंतर थेट औरंगाबदमध्ये सभा भरवली आहे. औरंगाबादच्या आजच्या सभेत राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलतील, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यांच्या भाषणातील संभाव्य 10 मुद्दे पुढील प्रमाणे असतील.