Aurangabad Fire | इलेक्ट्रिक पोलला धडकली अन् कारनं पेट घेतला, औरंगाबादेत गणोरीजवळ भीषण घटना
औरंगाबादमध्ये (Aurangabad Fire ) वीजेच्या खांबाला (Electric pole) धडकल्यामुळे कारने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन दुपारी भरधाव वेगात असलेली ही कार वीजेच्या खांबावर धडकली आणि गाडीनं पेट घेतला.
औरंगाबाद | कडाक्याच्या उन्हामुळे तापमान वाढून अचानक आग लागण्याचे प्रकार घडत असतात. मात्र औरंगाबादमध्ये (Aurangabad Fire ) वीजेच्या खांबाला (Electric pole) धडकल्यामुळे कारने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन दुपारी भरधाव वेगात असलेली ही कार वीजेच्या खांबावर धडकली आणि गाडीनं पेट घेतला. सुदैवाने चालक समयसूचकता दाखवत गाडीतून (Burning car) बाहेर पडला आणि त्याच्या डोळ्यादेखत आगीच्या ज्वालांनी कारचा ताबा घेतला. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांनी काही वेळ थांबून हा धक्कादायक प्रकार आणि त्याची भीषणता अनुभवली.
कुठे घडला प्रकार?
धावत्या चारचाकीने पेट घेतल्याची ही भीषण घटना औरंगाबाद फुलंब्री रोडवरील नायगाव फाटा गणोरी येथे घडली. वीजेच्या खांबावर आदळून लागलेल्या आगीत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र ड्रायव्हरने वेळीच यातून बाहेर उडी मारल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
Aurangabad Fire | गणोरी येथे धावत्या चारचाकीने घेतला पेट..जीवितहानी नाही pic.twitter.com/wBlcA5I8R8
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2022
बर्निंग कारचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, औरंगाबाद फुलंब्री रोडवर झालेल्या या घटनेचा थरार रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी आपल्या मोबाइलमध्ये चित्रीत केला. औरंगाबादमधील सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
इतर बातम्या-