Aurangabad | Samruddhi Highway वरील सावंगी इंटरचेंजचा अंडरपास प्रगतीपथावर, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी
औरंगाबाद| औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या 112 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे (Samruddhi highway) काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यात पाच इंटरचेंज (Interchange)असून त्यापैकी तीन ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामेदेखील लवकरच पूर्ण होणार आहेत. सावंगी इंटरचेंजच्या अंडरपासचे काम सध्या वेगाने सुरु आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) […]
औरंगाबाद| औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या 112 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे (Samruddhi highway) काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यात पाच इंटरचेंज (Interchange)असून त्यापैकी तीन ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामेदेखील लवकरच पूर्ण होणार आहेत. सावंगी इंटरचेंजच्या अंडरपासचे काम सध्या वेगाने सुरु आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी व्यक्त केला. चव्हाण यांनी शुक्रवारी सावंगी इंटरचेंज अंडरपासला भेट देऊन प्रत्यक्ष या कामाची पाहणी केली. हा मार्ग सुरु झाल्यावर जळगावकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी थांबणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील समृद्धीचे काम दोन कंपन्यांकडे
औरंगाबाद जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे काम दोन कंपन्यांकडे देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली. मेघा एजन्सीकडे 54 किमी तर एल अँड टी कंपनीकडे 58 किलोमीटरचे काम देण्यात आले आहे. एल अँड टी कंपनीकडील काम शंभर टक्के झाले असून मेघा एजन्सीकडील काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. सम-द्धी महामार्गासाठी शेंद्रा एमआयडीसी, हर्सूलजवळील सावंगी, माळीवाडा, लासूर (हडस पिंपळगाव), जांभरगाव (वैजापूर) असे एकूण पाच इंटरचेंज आहेत. येथून वाहनचालक मुंबई किंवा नागपूरकडे जाऊ शकतील.
जिल्ह्यात समृध्दी महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. जिल्ह्यातील 5 इंटरचेंज पैकी 3 चे काम पूर्ण. सावंगी इंटरचेंजच्या अंडरपासचे काम महिनाभरात पूर्ण होऊन जळगांव कडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी थांबणार असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले सविस्तर बातमी: https://t.co/aJ47eQly75 pic.twitter.com/37yCC72326
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) April 8, 2022
कसा आहे समृद्धी महामार्ग?
नागपूर ते मुंबई असा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग असेल. यात 10 जिल्हे, 26 तालुके आणि आसपासची 392 गावे जोडली जातील. या महामार्गाची गती मर्यादा 150 किमी आहे. त्यामुळे नागपूर ते मुंभई हे अंतर फक्त 8 तासात कापले जाईल. मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तास आणि औरंगाबाद ते नागपूर ४ तास वेळ लागेल. या मार्गामुळे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, वर्धा व जालना कोरडे बंदरे आणि मुंबईच्या जेएनपीटीला जोडली जातील.
कधी पूर्ण होणार महामार्ग?
समृद्धी महामार्गाचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले असून मार्च 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पुढील काही दिवसात नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.
इतर बातम्या-