Samruddhi mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर केमिकल ट्रकचा भीषण अपघात, सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू

महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावलं. बचाव पथकाने आग विझवली. मात्र ट्रकमधील प्रवाशांना वाचवण्यात अपयश आलं.

Samruddhi mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर केमिकल ट्रकचा भीषण अपघात, सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 8:42 AM

दत्ता कनवटे,  छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Smabhajinagar) जिल्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली. केमिकलने भरलेला एक ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रकमध्ये प्रचंड केमिकल्स होते. त्यामुळे खाली कोसळताच ट्रकने पेट घेतला. ही घटना एवढी भीषण होती की, ट्रकमधील प्रवाशांना प्राण वाचवण्याची संधी मिळाली नाही. ट्रकमधील सर्वच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर घटनेतील मृतांचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र ड्रायव्हरसह सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कुठे घडली घटना?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फतियाबाद परिसरातील ही घटना आहे. मध्यरात्रीच्या सुमारास केमिकलने भरलेला एक ट्रक या मार्गावरून जात होता. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र ट्रकचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रकमधून केमिकलची वाहतूक केली जात होती. पुलावरून खाली कोसळल्याने ट्रकमधील केमिकल्सने पेट घेतला. महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावलं. बचाव पथकाने आग विझवली. मात्र ट्रकमधील प्रवाशांना वाचवण्यात अपयश आलं.

शुक्रवारी संध्याकाळीच अपघात

नव्याने सुरु झालेल्या समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळीच स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. ही गाडी पलटल्याने एकाचा मृत्यू झाला. तर अपघातात इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला. नागपूर ते मुंबईच्या दिशेने जात असताना राजेवाडी परिसरात स्कॉर्पिओ उलटल्याने ही घटना घडली. यात अमरसिंग सवकीलाल सिंग या व्यक्तीचा मृत्यू झाला. तो उत्तर प्रदेशातील रहिवासी होता. तर गाडीतील वीरेंद्र सिंग आणि राजे सिंग हे दोघं गंभीर जखमी झाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.