Schools | औरंगाबादेत सोमवारपासून पहिली ते चौथीचे वर्गही भरणार, परीक्षेच्या तारखांबाबत शाळांचा काय निर्णय?

सर्व शाळांमध्ये शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती आणि पूर्णवेळ शाळा भरवता येतील का याची पडताळणी केली जावी, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच कोरोनासंबंधी सूचना न पाळणाऱ्या शाळांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचनादेखील शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.

Schools | औरंगाबादेत सोमवारपासून पहिली ते चौथीचे वर्गही भरणार, परीक्षेच्या तारखांबाबत शाळांचा काय निर्णय?
औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 11:07 AM

औरंगाबादः यंदाच्या आठवड्यात शहरातील पाचवी ते सातवीच्या शाळा सुरु झाल्या असून आता पुढील आठवड्यात पहिली ते चौथीचे वर्गही भरतील, असा निर्णय महापालिकेने (Aurangabad municipal corporation) घेतला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी सध्या नियंत्रणात असल्यामुळे महापालिकेने सर्व इयत्तांचे वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. 14 फेब्रुवारीपासून पहिली ते चौथीचे वर्ग (Aurangabad schools) भरवले जातील. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar pandey) यांनी ही माहिती दिली. तसेच शहरातील पहिली ते बारावीपर्यंतच्या कोचिंग क्लासेसनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्व शाळा व्यवस्थापनाने कोरोनासंबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मनपाच्या सूनचा न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शाळांसाठी नियमावली काय?

मनपा प्रशासकांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, शालेय व्यवस्थापक, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतरांशी झालेल्या चर्चेनंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र वर्ग सुरु करताना शाळांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहनचालक, रिक्षाचालक यांना कोरोना लसीकरण बंधनकारक आहे. कोरोना नियमांच्या पालनासह शाळेत गर्दी टाळण्यासाठी पालकांना प्रवेश देऊ नये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, वर्गात 15 ते 20 विद्यार्थीच उपस्थित असावे, आदी नियमावली जारी करण्यात आली आहे.

परीक्षा कधी घेणार?

पहिली ते नववीच्या या सत्राच्या अंतिम परीक्षा मार्च अखेर होणार होत्या. मात्र त्याऐवजी परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येतील, असा ठरवा मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला. सर्वच व्यवस्थापनांच्या शाळेत 30 एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शिकवण्याचे नियोजन यापूर्वीच शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा आणि शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी एप्रिल 15 पर्यंत प्रत्यक्ष शिक्षण व त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याचा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला असून यावरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

पूर्ण वेळ शाळांची पडताळणी

सर्व शाळांमध्ये शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती आणि पूर्णवेळ शाळा भरवता येतील का याची पडताळणी केली जावी, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच कोरोनासंबंधी सूचना न पाळणाऱ्या शाळांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचनादेखील शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.

इतर बातम्या-

Sugarcane Sludge : उत्तर महाराष्ट्रात वाढला ऊसाचा ‘गोडवा’ पण शेतकऱ्यांच्या मागण्याही होणार का पूर्ण?

IPL 2022 Auction: लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने निवडले 7 खेळाडू, मोठी बोली लावण्याची तयारी?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.