औरंगाबाद शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मणिपूरमध्ये, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी!

मणिपूर राज्यात शिवसेना उमेदाराच्या प्रचाराची जबाबदारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी औरंगाबादचे नेते थेट मणिपूरमध्ये दाखल झाले असून पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम मणिपूरमध्ये असेल.

औरंगाबाद शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मणिपूरमध्ये, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी!
मणिपूरमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 5:50 PM

औरंगाबाद| औरंगाबादेतील नेत्यांना शिवसेनेचा सर्वात मोठा नेता मीच आहे, बाकीच्यांशी माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी टाकलेली दिसून येत आहे. औरंगाबादचे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सध्या मणिपूरमध्ये शिवसेनेच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अन्य काही पदाधिकारी आणि शिवसैनिकदेखील आहेत. 13 फेब्रुवारी रोजी चंद्रकांत खैरे मणिपूर विधानसभेच्या प्रचार दौऱ्यासाठी दाखल झाले असून पुढील चार दिवस ते तेथील उमेदवारांचा प्रचार करतील. मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणूक असून या ठिकाणी शिवसेनेने पाच जागांवर उमेदवार उभा केला आहे.

शिवसेनेची महाराष्ट्राबाहेर घोडदौड

महाराष्ट्रात भाजपविना महाविकास आघाडी करत सत्तेत आलेल्या शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरही सर्व शक्ती पणाला लावलेली दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत तर गेल्या कित्येक दिवसांपासून गोव्यात तळ टोकून आहेत.  यापूर्वीही शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर उमेदवार उभे केले, मात्र ते नावालाच राहिले. यंदा मात्र उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यानंतर आता मणिपूरमध्येही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या चारही राज्यांमध्ये शिवसेनेने मोजकेच उमेदवार उभे केले असून त्यांच्या विजयासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे.

महाराष्ट्राबाहेर प्रचारासाठी मातब्बर नेते

यंदा उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्येही निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून या चारही ठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेने मातब्बर नेत्यांची फौज लावली आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी युवासेनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह दिग्गज नेते मैदानात उतरवले आहते. मणिपूर राज्यात शिवसेना उमेदाराच्या प्रचाराची जबाबदारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी औरंगाबादचे नेते थेट मणिपूरमध्ये दाखल झाले असून पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम मणिपूरमध्ये असेल.

इतर बातम्या-

VIDEO: साडेतीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?, किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

GOLD PRICE TODAY: 50 हजारांचा टप्पा पार, मुंबई ते नागपूर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे भाव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.