Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | ‘कराडांना नगरसेवक, महापौर मी केलं.. दिल्लीही मीच दाखवली, तेच म्हणतात खैरे अज्ञानी’, कराड आणि खैरेंमधील टिकेच्या फैरी सुरूच

औरंगाबादमधील पाणी प्रश्नावर महापालिका प्रशासनातर्फे प्रभावी उपाययोजना सुरु असून लवकरच शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असं आश्वासन चंद्रकांत खैरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिलं.

Aurangabad | 'कराडांना नगरसेवक, महापौर मी केलं.. दिल्लीही मीच दाखवली,  तेच म्हणतात खैरे अज्ञानी', कराड आणि खैरेंमधील टिकेच्या फैरी सुरूच
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 6:00 PM

औरंगाबादः डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांना नगरसेवक मी केलं. महापौरही मी केलं आणि आता तेच म्हणतात की, खैरे अज्ञानी आहेत, असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत खैरे यांनी हे वक्तव्य केलं . शहरातील पाणी प्रश्नावरून चंद्रकांत खैरे यांनी आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली.  औरंगाबाद विमानतळाला (Aurangabad airport) छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव देण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये टोलवाटोलवीचं राजकारण सुरु आहे. यादरम्यान, कराड यांना कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्याचं वक्तव्य डॉ. भागवत कराड यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी कराडांना चांगलंच सुनावलं. तुमच्या राजकीय वाटचालीच्या सुरुवातीला मी प्रोत्साहन दिलं.. तुम्हाला दिल्ली मी दाखवली. आणि आज तुम्हीच खैरे अज्ञानी आहेत, असं म्हणता, असं वक्तव्य त्यांनी केलं. तसेच डॉ. भागवत कराड हे अर्थ राज्यमंत्री असले तरीही दिल्लीत राज्यमंत्र्याला काहीही किंमत नसते, असंही त्यांनी कराड यांना सुनावलं.

‘जलील यांच्याबद्दल मुस्लिमांच्याच तक्रारी’

पाणी प्रश्नावरून भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 23 मे रोजी औरंगाबादमध्ये विराट मोर्चा काढणार आहेत. यावेळी खासदार जलील यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे. इथे एकटे फिरलात तर लोक तुम्हाला हंड्यांनीच मारतील, कारण औरंगाबादचा पाणीप्रश्न चिघळण्यासाठी शिवसेनेप्रमाणेच भाजपदेखील जबाबदार आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, खासदार जलील स्वतः लोकांमध्ये पिरत नाही. इम्तियाज जलीलला अक्कल तरी आहे का बोलायची? तो काहीही बोलतो. तो लोकांमध्ये फिरत नाही. त्यामुळे काही मुस्लीम लोकच माझ्याकडे येऊन त्याची तक्रार करतात,’ असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.

औरंगाबादचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार

औरंगाबादमधील पाणी प्रश्नावर महापालिका प्रशासनातर्फे प्रभावी उपाययोजना सुरु असून लवकरच शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असं आश्वासन चंद्रकांत खैरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिलं. तसंच भाजपने शहरातील पाणी पुरवठ्यात मुद्दामहून अडचणी आणल्याचा आरोपही खैरे यांनी केला. जलवाहिनी फोडून संबंधित भागातील नागरिकांचा खोळंबा केल्याचा आरोपही खैरे यांनी केला. मात्र आता पाणीपुरवठ्यावर महापालिकेची करडी नजर असून कुणीही यात खोडा घालू शकणार नाही, असं वक्तव्य खैरे यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

‘संभाजीनगर’वरून शिवसेना-भाजप वॉर

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहे. सध्या राज्य सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपतर्फे केली जात आहे. तर भाजपची सत्ता राज्यात होती, त्यावेळी तुम्हीच यासाठी का प्रयत्न केले नाहीत, असा सवालही शिवसेनेकडून विचारण्यात येत आहे. तसेच औरंगाबादमधील विमानतळाचे नावही छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यावरून भाजप शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध सुरु आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.