3 वर्षांचं प्रेम, 3 महिन्यांपूर्वी लग्न, आणि आता डॉक्टर तरुणीची आत्महत्या! औगंबादेत खळबळ, स्वतःच हातावर इजेक्शन घेत जीव दिला

Aurangabad Suicide News : डॉ वर्षा यांनी पाच पानी सुसाईड नोटही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आईवडिलांची माफीही मागितली आहे.

3 वर्षांचं प्रेम, 3 महिन्यांपूर्वी लग्न, आणि आता डॉक्टर तरुणीची आत्महत्या! औगंबादेत खळबळ, स्वतःच हातावर इजेक्शन घेत जीव दिला
धक्कादायकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 9:46 AM

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Suicide News) जिल्ह्यामध्ये डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या डॉक्टर (Aurangabad Doctor Suicide) तरुणीने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय. या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर तरुणीच्या पतीसह सासूवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाच पानांची सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. स्वतःच तिने आपल्या हातावर इंजेक्शन घेतलं आणि जीव दिलाय. रक्तवाहिनीत इन्सुलिनचं इजेक्शन घेत डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचं नाव वर्षा (Dr Varsha in Aurangabad) असून तिनं लव्ह मॅरेज केलं होतं. तीन महिन्यांआधीच तिचं लग्न झालं होतं. डॉक्टर वर्षा यांचा पती इंजिनिअर होता. तीन वर्षांपासून वर्षा आणि तिच्या पतीचे प्रेमसंबंध होतं. मात्र लग्नाला अवघे काही महिने उलटल्यानंतर डॉक्टर वर्षा यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.

औरंगाबादेत खळबळ

वर्षा आंबदास व्यवहारे यांचे धनंजय वसंत मोरे यांच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही तीन महिन्यांआधीच लग्नही केलं होतं. पण लग्नाच्या काही महिन्यांतच प्रचंड तणावाखाली असलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वर्षा व्यवहारे यांच्या आईवडिलांसह नातलगा या घटनेनं धास्तावले असून मुलीनं उचललेलं टोकाचं पाऊल व्यवहारे कुटुंबीयांच्या मनाला चटका लावून गेलंय.

पाच पानांची सुसाईड नोट

डॉ वर्षा यांनी पाच पानी सुसाईड नोटही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आईवडिलांची माफीही मागितली आहे. दरम्यान, या सुसाईट नोटच्या आधारे औरंगाबाद पोलीस पुढील तपास करत असून या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. ज्या मुलीलाल लहानाचं मोठं करुन डॉक्टर बनवलं, तिनं आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर वर्षा यांच्या आईवडिलांनी एकच आक्रोश केलाय. आता पोलिसांनी डॉ. वर्षा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत पती धनंजय आणि सासूनवर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पुढील तपासही पोलिसांकडून केला जातोय.

हे सुद्धा वाचा

कोल्हापुरातील डॉक्टर तरुणीची आत्महत्या

दरम्यान, काही महिन्यांआधी कोल्हापुरातही एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली होती. तिनेही स्वतःच हाताला इंजेक्शन टोचून घेत जीव दिला होता. या डॉक्टर तरुणीचा मृतदेह रस्त्यावर बेवारस पडल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर ही डॉक्टर तरुणी कोल्हापुरातील एका प्रसिद्ध डॉक्टरची मुलगी असल्याचीही माहिती समोर आली होती. कोल्हापूरनंतर आता औरंगाबादेतही अशीच घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडालीय.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.