Aurangabad | सूर्या लॉन्सवरील हळदीच्या कार्यक्रमात चोरलेले 42 तोळे दागिने मिळाले, औरंगाबाद पोलिसांची कारवाई

डिसेंबर महिन्यातील सूर्या लॉन्समधील या जबरी चोरीमुळे औरंगाबादमध्ये खळबळ माजली होती. विशेष म्हणजे 36 लाख रुपयांची दागिन्यांची बॅग पळवणारा हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

Aurangabad | सूर्या लॉन्सवरील हळदीच्या कार्यक्रमात चोरलेले 42 तोळे दागिने मिळाले, औरंगाबाद पोलिसांची कारवाई
जैस्वाल यांना दागिने परत करताना पोलीस अधीक्षक निमित गोयल
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 4:19 PM

औरंगाबादः शहरातील सूर्या लॉन्सवरील एका हळदीच्या कार्यक्रमात झालेली हायप्रोफाइल चोरी (Aurangabad theft) प्रकरणी स्थानिक गुन्हे शाळेने यशस्वी कारवाई केली आहे. येथील परराज्यातील टोळीने 6 डिसेंबर 2021 रोजी ही हायप्रोफाइल चोरी केली होती. औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे (Crime branch Aurangabad) शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला गजाआड केले. त्याच्याकडून 42.5 तोळे दागिने जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी फिर्यादी सुनील जैस्वाल (Sunil Jaiswal) यांना हे दागिने परत केले. पोलिसांनी परत केलेल्या दागिन्यांची किंमत 24 लाख 77 हजार 850 रुपये एवढी आहे. तसेच पोलिसांनी या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपीचे नाव अभिषेक विनोद भालुनिया असे आहे. या चोरीनंतर औरंगाबामध्ये मोठी खळबळ माजली होती.

6 डिसेंबर रोजी झाली होती चोरी

सूर्या लॉन्समध्ये 6 डिसेंबर 2021 रोजी ही चोरी झाली होती. व्यापारी असलेले जैस्वाल यांच्या मुलाचा विवाह सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी ते नागपूरहून औरंगाबादेत आले होते. 6 डिसेंबरला रात्री हळदी समारंभ असल्याने सर्व दागिने वधूच्या अंगावर घालून पुन्हा काढून ठेवले होते. त्याचवेळी समारंभात घुसलेल्या आरोपींनी आणि त्याच्या साथीदारांनी 56 तोळे दागिने अससलेली बॅग लंपास केली होती.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी कैद

डिसेंबर महिन्यातील सूर्या लॉन्समधील या जबरी चोरीमुळे औरंगाबादमध्ये खळबळ माजली होती. विशेष म्हणजे 36 लाख रुपयांची दागिन्यांची बॅग पळवणारा हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा सगळा प्रकार लक्षात येताच त्या रात्रीच चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक देविदास गात, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण करुन गँगचा ठावठिकाणा शोधून काढला. चोरट्यांपैकी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 42.5 तोळे सोने जप्त करण्यात आले. हे सोने गुरुवारी जैस्वाल यांना परत करण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक योगेश खटाने यांची उपस्थिती होती.

इतर बातम्या-

Nanded Bicycle | भंगारातून देशी जुगाड, चक्क पोरासाठी बनवली मोटारसायकल

‘लोच्या झाला रे’ परदेशातही प्रदर्शित होणार, चित्रपटाची टीम सातासमुद्रापार धम्माल करणार

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.