मेरे बाप को मोबाइल पर फोटो भेजता है? तोंडात शिव्या, हातात तलवार, मुख्याध्यापकांवर सपकन्… औरंगाबादमध्ये थरार!

हा प्रकार घडल्यानंतर मुख्याध्यापक चव्हाण व अधीक्षक जाधव हे मजिदच्या वडिलांना सांगण्यासाठी मकरणपूर येथे जात होते. त्याच वेळी मजिदने त्यांना रस्त्यातच गाठले व तलवारीने अधीक्षक संतोष यांच्या डाव्या खांद्यावर वार, तर चव्हाण यांच्या उजव्या खांद्यावर व कानावर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले.

मेरे बाप को मोबाइल पर फोटो भेजता है? तोंडात शिव्या, हातात तलवार, मुख्याध्यापकांवर सपकन्... औरंगाबादमध्ये थरार!
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:28 PM

औरंगाबादः शाळेतल्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला (Aurangabad Roadromio) परिसरात येण्यास मज्जाव केल्यामुळे मुख्याध्यापकावरच प्राणघातक हल्ला ( Attack on Headmaster ) केल्याची थरारक घटना औरंगाबादमध्ये घडली. कन्नड शहरातील मकरणपूर येथे घडलेल्या या घटनेत मुख्याध्यापकासह अधीक्षकदेखील जखमी झाला. शुक्रवारी दुपारी आरोपीने मुख्याध्यापकाला धमकी दिली. त्यानंतर मुख्याध्यापक त्याच्या वडिलांकडे तक्रार करण्यासाठी जात असताना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आरोपीनं त्यांच्यावर तलवारीनं प्राणघातक हल्ला (attack with sword ) केला. या घटनेमुळे कन्नडसह औरंगाबाद शहरात खळबळ माजली. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

कुठे घडला प्रकार?

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड शहरात कारखाना परिसरात जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय आहे. येथे दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी मजिद जमील शेख (रा. मकरणपूर) हा मागील अनेक दिवसांपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवर फिरत मुलींची छेड काढत होता. मुख्याध्यापक ए. पी. चव्हाण यांनी त्याला अनेकदा समजावून सांगितले. मात्र त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही. अखेर चव्हाण यांनी त्याला शाळेच्या परिसरात येण्यास मज्जाव केला.

Kannad Aurangabad

मेरे बाप को फोटो निकालकर भेजता है?

शुक्रवारी शाळा सुटण्याच्या सुमारास आरोपी माजिद शाळेच्या गेटसमोर आला. मुख्याध्यापक चव्हाण यांना दमदाटी करु लागला. ‘स्कूल के सामने चक्कर मारते हुए मेरे फोटो निकालकर मेरे बाप को मोबाइल पर भेजता है क्या…’ असे म्हणत मुख्याध्यापक व अधीक्षक संतोष जाधव यांच्याशी त्यानं वाद सुरु केला. प्रचंड शिवीगाळही केली. तसेच तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकीही दिली. हा प्रकार घडल्यानंतर मुख्याध्यापक चव्हाण व अधीक्षक जाधव हे मजिदच्या वडिलांना सांगण्यासाठी मकरणपूर येथे जात होते. त्याच वेळी मजिदने त्यांना रस्त्यातच गाठले व तलवारीने अधीक्षक संतोष यांच्या डाव्या खांद्यावर वार, तर चव्हाण यांच्या उजव्या खांद्यावर व कानावर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले.

आरोपी फरार, शोध सुरु

दरम्यान, शहर पोलीसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलवले. आरोपी फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला अटक व्हावी अशी मागणी शिक्षक सेना, शिक्षक भारतीसह सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. यावर 24 तासाच्या आत आरोपीला अटक करून असे आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे.

इतर बातम्या-

यवतमाळ – वणी पोलिसांवर मोठी कारवाई, चार पोलीस निलंबित; 18 जणांना कारणे दाखवा, काय आहे प्रकरण?

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता पहिली ते 8 वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार, अजित पवार यांची घोषणा

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....