बायकोला परीक्षेला सोडलं अन् काळानं गाठलं, औरंगाबादेत दोन दुचाकींचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार!
या अपघाताची माहिती मिळताच फौजदार सतीश भोसले, रामकृष्ण सागडे, सुधाकर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अनिरुद्ध शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात हलवले.
औरंगाबादः जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील (Paithan Accident) विचित्र अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी परस्परांवर एवढ्या जोरात आदळल्या की दोघांना जागीच प्राण गमवावे लागले. पैठण पाचोड रस्त्यावर (Road Accident) डाव्या कालव्याजवळ ही घटना घडली. यातील एक तरुण आपल्या पत्नीला बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सोडून परत निघाला होता (Accident Death). तर दुसरा नातेवाईकांच्या घरी कुंकवाच्या कार्यक्रमावरून गावी परतत होता. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.
दुचाकींचा चक्काचूर
पैठण- पाचोड रस्त्यावर झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. गोन्ही गाड्या भरधाव वेगात असल्यामुळे एकमेकांवर आदळताच गाडीवरील नितीन साबळे हे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात सुमारे अडीचशे ते तीनशे फूट लांब जाऊन पडले. तर अपघातातील दुसरे जखमी खूप वेगाने जाऊन झाडावर लकटले. तर आणखी एक जण जागीच मृत्यूमुखी पडले.
अपघातातील मृतांची नावं
– अपघातात नितीन साबळे हे पत्नीला बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सोडून निघाले होते. यांचा मृत्यू झाला. – गणेश शेळके हे कुतुबखेडा येथे नातेवाईकाचा कुंकवाचा कार्यक्रम आटोपून बुलेटवर गावी परतत होते. हेदेखील अपघातात मृत्यूमुखी पडले. – अपघातातील जखमीचे नाव कळू शकले नाही.
जखमीवर उपचार सुरू
या अपघाताची माहिती मिळताच फौजदार सतीश भोसले, रामकृष्ण सागडे, सुधाकर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अनिरुद्ध शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात हलवले. तर जखमीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. शेतात फेकल्या गेलेल्या नितीन यांचा मृतदेह काढण्यासाठी रहाटगावचे सरपंच अशोक फसते व इतर गावकऱ्यांनी मदत केली.
इतर बातम्या-